शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांच्या भांडणात मुलींचे जीवन उद्ध्वस्त; एकीने लावला गळफास, दुसरीने पिले फिनाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 17:12 IST

आईवडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या मुलींनी टोकाचं पाऊल उचललं. मोठ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच लहान मुलीनेही फिनाईल पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देगोरेवाडातील घटना : परिसरात खळबळ

नागपूर : घरातील भांडणांचा मुलांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होतो. नागपुरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवडिलांच्या भांडणामुळे त्रस्त होऊन अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेतला. तर दुसऱ्या बहिणीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी मानकापूरच्या गोरेवाडा परिसरात घडली.

साक्षी अमरीतलाल तिवारी (१६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिवारी खासगी कंपनीत काम करतो. त्याला मुलगी साक्षी (१६), शिवांगी (१५) आणि मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. तिवारीचा नेहमीच पत्नीशी वाद होत होता. या वादामुळे साक्षी दु:खी होती. रविवारी सकाळी तिवारी मुलाला घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. पत्नी बाहेर गेली होती. साक्षी आणि शिवांगी घरी होत्या.

सकाळी १०.४५ वाजता शिवांगी अंघोळीसाठी गेली. यावेळी साक्षीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. अंघोळ करून परतल्यानंतर शिवांगीला बहीण फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. साक्षीच्या आत्महत्येमुळे शिवांगी खचली. तिने सुसाईट नोट लिहून आईवडिलांचे रोज भांडण होते, कालही भांडण झाले होते. यामुळे साक्षी दु:खी होती. ताई मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी सुद्धा तुझ्यासोबत येत आहे, असे लिहून शिवांगीने फिनाईल प्राशन केले.

यानंतर शिवांगीने शेजाऱ्यांना साक्षीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी साक्षीच्या घरी जाऊन पोलिसांना सूचना दिली. दरम्यान शिवांगीलाही उलट्या होणे सुरू झाले. शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर शिवांगीने फिनाईल पिल्याचे सांगितले. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. साक्षी दहावीची विद्यार्थिनी होती तर शिवांगी नववीत शिकत आहे. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरDeathमृत्यू