नागपुरात नातेवाईकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:25 IST2019-02-25T20:25:04+5:302019-02-25T20:25:37+5:30
वडिलांच्या वयाच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी रतनसिंग हरबनसिंग धिंडसा याला अटक केली आहे.

नागपुरात नातेवाईकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलांच्या वयाच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी रतनसिंग हरबनसिंग धिंडसा याला अटक केली आहे.
पीडित मुलगी सध्या १६ वर्षांची आहे. आरोपी रतन तिचा नातेवाईक आहे. दोन वर्षांपूर्वी एकदा ती घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी रतनने तिच्यावर बलात्कार केला. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास बजावले. जीवाच्या भीतीने मुलगी गप्प बसल्याचे पाहून आरोपी निर्ढावला. तो वारंवार तिच्यावर बलात्कार करू लागला. सप्टेंबर २०१८ पर्यंत त्याने तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतर मुलगी दुसऱ्या ठिकाणी गेल्याने काही दिवस आरोपीपासून तिची सुटका झाली. अलीकडे तो पुन्हा मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्यामुळे मुलीने आपल्या मैत्रिणींना आणि नंतर नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रकरण कळमना ठाण्यात गेले. पोलिसांनी या प्रकरणात रविवारी गुन्हा दाखल करून पोक्सो कायद्यानुसार बलात्कार तसेच विनयभंगाच्या आरोपाखाली आरोपी रतनला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.