अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ११ वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:12 IST2019-05-10T00:11:53+5:302019-05-10T00:12:57+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे कारावास व ७००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ७५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ११ वर्षे कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे कारावास व ७००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ७५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.
शुभम राजेश कनोजिया (२३) असे आरोपीचे नाव असून तो म्हाडा कॉलनी, नारी येथील रहिवासी आहे. ही घटना २२ एप्रिल २०१५ ते २२ एप्रिल २०१६ यादरम्यान घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. आरोपीने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्यातून आरोपीने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. आरोपीने गोळ्या देऊन मुलीचा गर्भपात केला. ही घटना उघडकीस झाल्यानंतर आरोपीविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यावरून २२ एप्रिल २०१६ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त रमेश तायडे व पोलीस उपनिरीक्षक अरुण बकाल यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी तपासलेले साक्षीदार व विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.