शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

विधानभवनात मंत्र्यांची दालने अपुरी, अडीज कोटी खर्च करून १६ दालने उभारण्याची मंजुरी

By आनंद डेकाटे | Updated: November 8, 2025 19:36 IST

Nagpur : विधान परिषद असलेल्या इमारतीच्या मागच्या भागातील मोकळ्या जागेवर ही तात्पुरती दालने तयार करण्यात येणार आहे. या दालनात सर्व सुविधा असणार असून मंत्र्यांच्यी पीएच्या रहाण्याचीही व्यवस्था असेल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होणार असून २८ नोव्हेंबरला सचिवालय नागपुरात येणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत विधान भवनाच्या दोन्ही इमारतींमध्ये दालने अपुरी पडत असल्याने मंत्र्यांसाठी विधानभवन परिसरात १६ दालने तयार करण्यात येणार आहे. ही दालने तात्पुरत्या स्वरूपातील असतील.

विधान परिषद असलेल्या इमारतीच्या मागच्या भागातील मोकळ्या जागेवर ही तात्पुरती दालने तयार करण्यात येणार आहे. या दालनात सर्व सुविधा असणार असून मंत्र्यांच्यी पीएच्या रहाण्याचीही व्यवस्था असेल. मुख्यमंत्री आणि मंत्री याच भागाकडून विधिमंडळात प्रवेश करतात. यापूर्वी येथे तात्पुरत्या स्वरूपात कॅबिनेट हॉल तयार करण्यात आला होता हे विशेष. या तात्पुरत्या स्वरूपाच्या दालनासाठी २.५० कोटी खर्चाचा प्रस्ताव असून विधिमंडळ सचिवालयाकडून त्याला मंजुरीसुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री व राज्यमंत्र्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे दालनांची संख्या अपुरी पडत आहे. यापूर्वी सहा मंत्र्यांची व्यवस्था नवीन इमारतीत करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही दालनांची संख्या अपुरी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे मंत्री व त्यांच्या पीएंसाठी तात्पुरत्या स्वरूरात हे १६ दालन करण्यात येणार आहे.

"अधिवेशनासाठी विधानभवनात मंत्र्यांसाठी १६ तात्पुरती दालने तयार केली जाणार आहे. ही दालने नट बोल्ट लावून तात्पुरत्या स्वरूपाची राहतील. ती नंतर काढण्यात येईल."- जनार्दन भानुसे, अधीक्षक अभियंता, नागपूर विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Assembly to Build 16 Minister Cabins for Winter Session

Web Summary : Due to a shortage of space for ministers in Nagpur, the Maharashtra Assembly will construct 16 temporary cabins at a cost of ₹2.5 crore for the upcoming winter session. These cabins will accommodate ministers and their staff.
टॅग्स :nagpurनागपूरVidhan Bhavanविधान भवनWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन