शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दुष्काळ घोषित करण्यासाठीचे निकष जटील असल्याची महसूल मंत्र्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:13 IST

दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारचे नवीन निकष अतिशय जटील असल्याची बाब महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत कबुल केली.

ठळक मुद्देकेंद्राला विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारचे नवीन निकष अतिशय जटील असल्याची बाब महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत कबुल केली. हे निकष सोपे व सहज करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदारांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला सुद्धा जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.भाजपाचे सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अंमळनेर तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रश्न उपस्थित करीत या तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करा. जिल्हा नियोजन समितीपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत यासंदर्भात मागणी व तक्रार करून झाली. परंतु मदत मिळालेली नाही. तेव्हा राज्य सरकार स्वत:हून या शेतकऱ्यांना काही मदत करेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आजच मदत देण्याचे निर्देश दिले जातील, असे सांगितले. केंद्र सरकारच्या नवीन निकषामध्ये मातीतील ओलावा नुसार परिसर दुष्काळग्रस्त आहे की नाही, हे ठरवले जाणार आहे.एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाला केंद्राचा ‘फतवा’ असे म्हणत यात महाराष्ट्रातील एकही गाव दुष्काळग्रस्त घोषित होणार नाही, असे संगितले. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे म्हणणे योग्य होणार नाही. नवीन निकषामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. नवीन निकषातील अटी अतिशय जटील आहेत ही बाब मात्र त्यांनी मान्य केली.खडसे यांनी प्रत्येक तालुक्यातील किती गावे ५० पैशापेक्षा कमी आहेत याची माहिती दिली. त्यावर आकडेवारी तपासून दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला....तर एसडीआरएफ करेल मदतमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की, दुष्काळ प्रभावित परिसराला मदत मिळाली नाही. तर राज्य सरकार एसडीआरएफच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करेल. अशा गावांना मदत देण्यासाठी शासन सकारातक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Farmerशेतकरी