जखमींच्या मदतीसाठी वनराज्यमंत्री परिणय फुके धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:50 AM2019-07-31T00:50:32+5:302019-07-31T00:52:55+5:30

राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबविण्याची सूचना केली व जखमींच्या मदतीसाठी उतरले.

Minister of State for forest Parinay Fuke rushed to help the injured | जखमींच्या मदतीसाठी वनराज्यमंत्री परिणय फुके धावले

जखमींच्या मदतीसाठी वनराज्यमंत्री परिणय फुके धावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबविण्याची सूचना केली व जखमींच्या मदतीसाठी उतरले.
जखमींची अवस्था लक्षात घेता त्यांना तात्काळ उपचारासाठी पोलीस वाहनात बसवून इस्पितळाकडे रवाना करण्यात आले. यानंतरदेखील फुके यांनी दोघांवर उपचार झाले की नाही व त्यांची प्रकृती कशी आहे, याची माहिती जाणून घेतली. याअगोदरदेखील फुके यांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनचालकाची प्रकृती खराब झाली असता त्याला स्वत: इस्पितळात दाखल केले होते. मंगळवारीदेखीलअशाच पद्घतीने त्यांनी जखमी मोटरसायकलस्वारांची मदत करत माणुसकीचा परिचय दिला.

Web Title: Minister of State for forest Parinay Fuke rushed to help the injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.