शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"१९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:19 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. अनुकूल परिस्थिती असतानाही गोव्यात इतक्या जागा आम्हाला मिळाल्या नव्हत्या : नितीन गडकरी

"पाच राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालंय ते भाजपचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवणारी घटना आहे. पाच राज्यांमध्ये निवडणुका कठीण आहेत असं लोक चर्चा करत होते. प्रामुख्यानं गोव्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर १९९५ पासून मी काम करून आलोय. अनुकूल परिस्थिती असतानाही इतक्या जागा आम्हाला मिळाल्या नव्हत्या. मनोहर पर्रीकर असतानाही आम्हाला दरवेळी इतर लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत होता. परंतु यावेळी गोव्याच्या जनतेनं भाजपला पूर्ण बहुमत दिलं," असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. भाजपच्या विजयानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

"यावेळी निवडणुकीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. प्रमोद सावंतही मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली गोव्यात अभूतपूर्व यश मिळालं. गोव्याच्या निवडणुकीत अनेक पक्ष उतरले होते. भाजपला अपशकुन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं कंबर कसली होती. रोज वृत्तपत्रांना मुलाखती देऊन भाजपचा पराभव कसा करता येईल याचा प्रयत्न करत होते. परंतु गोव्याच्या जनतेनं त्यांचं काय स्थान आहे हे सिद्ध केलं," असं म्हणत गडकरींनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.उत्तराखंड, उत्तर प्रदेशातही मोठं यश"उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातही यश मिळालं. योगी आदित्यनाथ यांनी माझी भेट घेतली होती. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रानं आणि उत्तर प्रदेश सरकारनं काम केलं असं त्यांनी सांगितलं. जात, पंथ, पक्ष याच्या वर जाऊन आपल्या भविष्यासाठी भाजपवर विश्वास दाखवला हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुरातही आपला भक्कम पाया उभा राहीला," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Nitin Gadkariनितीन गडकरीManohar Parrikarमनोहर पर्रीकरNarendra Modiनरेंद्र मोदी