कोट्यवधींचे धान्य उघड्यावर

By Admin | Updated: April 12, 2015 02:32 IST2015-04-12T02:32:08+5:302015-04-12T02:32:08+5:30

कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे.

Millions of grains are open | कोट्यवधींचे धान्य उघड्यावर

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर

नागपूर : कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे. अचानक बदलत असलेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसानीची भीती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने येणाऱ्या शेतमालाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, सभापती, संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे.
कळमना मार्केटमध्ये गहू, चणा, तूर, धानाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गोदाम भरली असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावरच ठेवला आहे. गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांजवळ स्वत:च्या ताडपत्र्या नसल्याने, त्यांना तर चांगलाच फटका सहन करावा लागला. ज्यांनी ताडपत्र्या झाकल्या, त्यांचेही धान्याचे पोते खालून ओले झाले. धान्य ओले झाल्यामुळे शुक्रवारी परत शेतकऱ्यांना माल काढून वाळवावा लागला. माल स्वच्छ करून ठेवण्यासाठी पुन्हा हमाली द्यावी लागली.
पाण्यामुळे चणा डागी लागला होता. गव्हू काळा पडला होता. नुकसान झालेले बहुतांश शेतकरी हे नागपूर व जवळच्या जिल्ह्यातील आहे. तीन ते चार दिवसापासून ते आपला शेतमाल विक्रीसाठी कळमन्यात घेऊन आले आहे.
दरवर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमालाच्या सुरक्षेसाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Millions of grains are open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.