मिलिंद सोमण यांच्या हस्ते ‘कोअर’ वेलनेस सेंटरचे उद्घाटन

By Admin | Updated: August 7, 2016 02:30 IST2016-08-07T02:30:15+5:302016-08-07T02:30:15+5:30

रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी सेवा वाढविण्यासाठी आणि त्यांना मध्य भारतात जागतिक दर्जाची सेवा

Milind Soman inaugurates 'Core' Wellness Center | मिलिंद सोमण यांच्या हस्ते ‘कोअर’ वेलनेस सेंटरचे उद्घाटन

मिलिंद सोमण यांच्या हस्ते ‘कोअर’ वेलनेस सेंटरचे उद्घाटन

नागपूर : रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी सेवा वाढविण्यासाठी आणि त्यांना मध्य भारतात जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोअर वेलनेस सेंटरचा शुभारंभ केला आहे. सुप्रसिद्ध मॉडेल तथा बॉलिवूड कलावंत मिलिंद सोमण यांच्या हस्ते कोअर वेलनेस जीम, स्पा आणि सलूनचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये करण्यात आले.
कोअर वेलनेस सेंटरने आपल्या ग्राहकांना तसेच वंचित असलेल्या सदस्यांना स्पा, सलून आणि जीममध्ये व्यापक श्रेणीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोअर जीम हे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असून जीममध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची उपकरणे उपलब्ध आहेत. स्पा आणि सलूनच्या वतीने ग्राहकांना मेदयुक्त विशेष मिश्रणाच्या साह्याने थाय मसाज तसेच निवडक मसाज थेरपी आणि विशेष तेलाने मसाजची सेवा पुरविण्यात येईल.
ग्राहकांचे समाधान होईल, अशा पद्धतीने त्यांना कोअरमध्ये सेवा पुरविण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना आनंद होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर बोलताना अभिनेता मिलिंद सोमण म्हणाला, भारत देश हा स्वस्थ आरोग्यामुळे ओळखल्या जातो. भारताने जगाला स्वस्थ आरोग्याचा संदेश दिला आहे.
कोअर जीममध्ये आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची उपकरणे आणि सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हॉटेल सेंटर पॉर्इंटचे संचालक मिक्की अरोरा, अर्जुनसिंग अरोरा, गुरुचरण सिंग, अंगद अरोरा आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी हॉटेल सेंटर पॉर्इंट रामदासपेठ येथे संपर्क साधावा. (वा. प्र.)
 

Web Title: Milind Soman inaugurates 'Core' Wellness Center