शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

ऑगस्टमध्ये सुरू होणार मेट्रोचा व्यावसायिक रन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:16 IST

महामेट्रोच्या रिच-३ अंतर्गत सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगरपर्यंत ११ कि़मी. अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये आरडीएसओ आणि सीएमआरएसची चमूतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच व्यावसायिक रनसाठी मंजुरी मिळणार आहे.

ठळक मुद्देसीताबर्डी ते लोकमान्यनगर : ११ कि़मी. ११ स्टेशन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या रिच-३ अंतर्गत सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगरपर्यंत ११ कि़मी. अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये आरडीएसओ आणि सीएमआरएसची चमूतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच व्यावसायिक रनसाठी मंजुरी मिळणार आहे.लोकमान्यनगर ते सुभाषनगरदरम्यान ५.५ किमीच्या मार्गावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ मे रोजी ट्रायन रन घेण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यात उर्वरित कामे पूर्ण केली आहे. ९५ टक्के विद्युतीकरण झाले आहे. ११ कि़मी. मार्गावर व्हायाडक्ट कामाला १ डिसेंबर २०१६ रोजी सुरुवात करण्यात आली होती. आता १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. सरासरी एक दिवसात ४ सेगमेंट तयार करून केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत ३९३ पियरवर ३५६४ सेगमेंट लॉचिंग करीत व्हायाडक्टचे कार्य पूर्ण केले. यामध्ये ३९३ फाऊंडेशन, ३९३ पियर, ३५६४ सेगमेंट कास्टिंग, २६६ ओपन फाऊंडेशन, ५५८ पाईल, ३१८ पाईल कॅप, १४९ आय गर्डर कास्टिंग, ३३ डेक स्लॅब कास्टिंग, १२७ पाईल कॅप, ३४५ सेगमेंट स्पॅन लॉचिंग, ६१ कॉनकॉर्स आणि ट्रॅक आर्म्सचा समावेश आहे. हिंगणा येथील मेट्रोच्या कास्टिंग यार्डमध्ये व्हायाडक्टचे सर्व सेगमेंट तयार करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या मार्गावरील प्रकल्पाचे बांधकाम करताना २५ मीटर उंचीवर झाशी राणी चौक येथील शहीद गोवारी उड्डाण पूल येथे सिमेंट गर्डरचे यशस्वीरीत्या लॉचिंग करण्यात आले.या मार्गावर औद्योगिक वसाहती, कॉलेज, शासकीय कार्यालय असल्यामुळे वाहनांची जास्त वाहतूक असते. अशा परिस्थितीत निर्धारित वेळेत व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत वाहतूक आणि सिव्हील कामांचे योग्य नियोजन करीत महामेट्रोने बांधकाम पूर्ण केले आहे. हिंगणा येथे औद्योगिक कंपन्या आणि महाविद्यालये असल्याने या सर्व प्रवाशांना लवकर मेट्रोची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. या मार्गावरील लिटील वूड व अंबाझरी तलाव या ठिकाणी गॅलरी तयार करण्यात येत असून मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांना विहंगम दृश्य बघायला मिळेल.११ कि़मी. मार्गावर ११ स्टेशनसीताबर्डी इंटरचेंज, झाशी राणी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, शंकरनगर, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाषनगर, रचना रिंग रोड, बन्सीनगर, वासुदेवनगर, लोकमान्यनगर. या सर्व स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर