शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सीताबर्डी हिंगणा मार्गावर मेट्रो लवकरच धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 21:03 IST

वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे.

ठळक मुद्दे ११ कि़मी.रूळाचे काम पूर्ण : रशियातून रुळाची आयात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे. यासोबतच ओएचई केबलचे कार्य अंतिम टप्प्यात असून, लवकरच या ठिकाणी विद्युत लाईन चार्ज केल्या जाईल. ओएचई विद्युत केबलमुळे मेट्रो रेल्वे चालण्यास मदत होते.प्रकल्पात १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रुळ वापरण्यात आले आहेत. या रुळाची निर्मिती अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येते. त्यामध्ये रुळाच्या वरचा थर बळकट बनविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येते. त्यामुळे रुळाचे आयुष्य जास्त असते आणि देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो. या रुळाचे आयुष्य जास्त असते व देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी होतो. आरडीएसओने (अनुसंधान अभिकल्प आणि मानक संघटन) मेट्रोच्या कामासाठी ६० किलो १०८० एचएच रुळाचा वापर अनिवार्य केला आहे. रुळाचा वरचा थर कडक असल्यामुळे रेल्वेच्या चाकांना आधार मिळतो आणि स्थिरता प्रदान करते. एक कि़मी. ट्रॅक निर्मितीसाठी १२० टन रुळाची आवश्यकता असते. इतर मेट्रोमध्ये रुळाची लांबी १८ मीटर आहे. तर नागपूर मेट्रोमध्ये देशात पहिल्यांदाच २५ कि़मी. लांबीचे रुळ वापरण्यात आले आहेत. नागपूर मेट्रोने रशियावरून रुळाची आयात केली आहे.हे रुळ एवराज कंपनीच्या वेस्ट सायबेरियन मेटॅलर्जिकल कारखान्यात तयार करण्यात आले असून, तो रशियातील सर्वात मोठा रुळ तयार करणारा कारखाना आहे. रुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी ध्वनिलहरी चाचणी, प्रोफाईल मापन, विद्युत तपासणी, अल्ट्रासोनिक चाचणी, बार कोडिंग इत्यादी प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नागपूर मेट्रोने रुळाच्या चाचणी आणि निरीक्षणाकरिता जगातील सर्वोत्कृष्ट चाचणी आणि ऑडिटिंग एजन्सी एसजीएस वोस्तोंकला नियुक्त केले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर