शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

‘मेट्रो’, ‘मिहान’ मीच आणले; मुत्तेमवारांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:09 IST

नागपूरच्या विकासाच्या मुद्यावरुन कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मागील पाच वर्षांमध्ये शहरात कुठले प्रकल्प आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमागील पाच वर्षांत कुठले प्रकल्प आले ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या विकासाच्या मुद्यावरुन कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मागील पाच वर्षांमध्ये शहरात कुठले प्रकल्प आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागपुरात ‘मेट्रो’ तसेच ‘मिहान’ हे प्रकल्प तर मीच आणले होते. मात्र भाजपाचे नेते सर्व ‘क्रेडिट’ घेत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. रविवारी देवडिया कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.‘मेट्रो’ची सैद्धांतिक मान्यता आणणे, ‘डीपीआर’ तयार करणे मीच केले. भूमिपूजन होऊ शकले नाही. आता दोन दिवस ‘मेट्रो’ चालवली तर भाजपचे लोक ‘क्रेडिट’ घेत आहेत. नाना पटोले यांना शहराची माहिती तरी काय असे भाजपचे लोक म्हणतात. मात्र लोकसभेची निवडणूक ही उमेदवाराची नाही तर कार्यकर्त्याची असते. शासनाने बाबा रामदेव यांना कवडीमोल दरात जमीन दिली. मात्र येथे रोजगार तर मिळालेच नाही. शहरात रोजगारनिर्मिती किती झाली यावर भाजपचे लोक का बोलत नाहीत, असा सवाल मुत्तेमवार यांनी केला. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. पण विदर्भवाद्यांच्या तोंडाला गेल्या पाच वर्षांत पानेच पुसण्यात आली आहेत. नागपुरात संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी अशी लढाई असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन कामाला लागावे, असा या बैठकीत नेत्यांचा सूर होता. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, नाना पटोले, बाबुराव तिडके, यादवराव देवगडे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, शेख हुसैन, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, संजय महाकाळकर, अतुल लोंढे यांच्यासह शहर काँगे्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध आघाड्यांचे पदधिकारी उपस्थित होते.

बूथवर मते मिळाली तरच पद राहणारकाँग्रेसमधील अनेक नेते भाजपात गेले तर अनेक लाभार्थी झालेत. पक्षाच्या झेंड्याखाली राहतात पण इतरांसाठी काम करतात. अशा नेत्यांची गय केली जाणार नाही. राज्यात व देशात सत्ता नसूनही कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला. पक्षाचा पदाधिकारी असलेल्या बूथवर उमेदवाराला अधिक मते मिळाली तरच तो पदाधिकारी पदावर कायम राहील, असा इशारा विकास ठाकरे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Vilas Muttemwarविलास मुत्तेमवार