नॉन मेट्रो परिसरात मेट्रोने वाढविली कनेक्टिव्हिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:02+5:302021-01-03T04:12:02+5:30

प्रवाशांसाठी सुविधा : मेट्रो स्थानकावर पोहोचणे झाले सोपे नागपूर : शहरातील जे परिसर मेट्रो रेल्वेस्थानकाशी जुळलेले नाहीत अशा परिसरातील ...

Metro enhances connectivity in non-metro areas | नॉन मेट्रो परिसरात मेट्रोने वाढविली कनेक्टिव्हिटी

नॉन मेट्रो परिसरात मेट्रोने वाढविली कनेक्टिव्हिटी

प्रवाशांसाठी सुविधा : मेट्रो स्थानकावर पोहोचणे झाले सोपे

नागपूर : शहरातील जे परिसर मेट्रो रेल्वेस्थानकाशी जुळलेले नाहीत अशा परिसरातील नागरिकांसाठी मेट्रो रेल्वेने महापालिकेची आपली बस फिडर सर्व्हिस सुरु केली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु आहे. या सेवेत आणखी वाढ करीत म्हाळगीनगर, जयताळा, हिंगणा, ईसासनी परिसर देखील मेट्रो स्टेशनशी महापालिकेच्या आपली बसने जोडण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन प्रवास करणे सोईस्कर झाले आहे.

मेट्रो रेल्वेने उपलब्ध करुन दिलेल्या फिडर सर्व्हिसमध्ये म्हाळगीनगर ते जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनमध्ये संजय गांधी नगर, उदय नगर, तपस्यानगर, मानेवाडा वस्ती, ओंकारनगर, रामेश्वरी, सुयोगनगर, नरेंद्रनगर, नरेंद्र नगर पश्चिम, पंचदीप नगर आणि जयप्रकाशनगरचा समावेश आहे. जयताळा ते जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनमध्ये पांडे ले आऊट, जयप्रकाशनगर, कोतवालनगर, खामला, सहकारनगर, टेलिकॉमनगर, अग्ने ले-आऊट, स्वावलंबीनगर, ढोमणे सभागृह, दीनदयालनगर, पूर्व स्वावलंबीनगर, उमाटे कॉलेज, इंद्रप्रस्थ नगर, नासुप्र संकुल, पूर्व व पश्चिम सुर्वे नगर, प्रसाद नगर, अष्टविनायक नगर, जयताळाचा समावेश आहे. हिंगणा ते इसासनी लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन मार्गात हिंगणा हॉस्पिटल, हिंगणा गाव, हिंगणा सिटी, रायपूर, जिनिंग प्रेस, महाजन वाडी, वानाडोंगरी, वायसीसीसी, राजीवनगर, इलेक्ट्रिक झोन एमआयडीसी, आयसी फॅक्ट्री, एमआयडीसी परिसर, व्हीआयपी फॅक्टरी, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन, रायसोनी कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पिटल, सीआरपीएफ कॅम्प, पंचशील नगर, राय टाऊन, ईसासनी वस्ती येथे फिडर सर्व्हिस उपलब्ध राहील. बुटीबोरी ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान खापरी गाव, गवसी मानापूर, सहारा सिटी, जामठा गाव फाटा, शुअर टेक हॉस्पिटल, अशोकवन गाव, डोंगरगाव, वाकेश्वर, बोथली गाव, मोहगाव, बुटीबोरी येथे फिडर सर्व्हिस उपलब्ध राहील. खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटलमध्ये आर. के. मदानी कॉलनी, बुटीबोरी एमआयडीसी गेट बसस्टॉप, ब्ल्यूम डेल कॉलनी, दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान, एम्स हॉस्पिटलचा समावेश आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी सकाळ ते सायंकाळपर्यंत आपली बस उपलब्ध राहणार असून प्रवाशांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

...............

Web Title: Metro enhances connectivity in non-metro areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.