शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मोबाईल अ‍ॅपद्वारे नागपूर मेट्रोचा प्रवास होणार सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:04 IST

वासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोतर्फे मोबाईल अ‍ॅपच्या (अप्लिकेशन) माध्यमातून प्रवाशांना शहरात कुठेही सहज प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो स्टेशन, प्रवासी दर, मार्गिका, वेळापत्रक, पार्किंगची माहिती मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोतर्फे मोबाईल अ‍ॅपच्या (अप्लिकेशन) माध्यमातून प्रवाशांना शहरात कुठेही सहज प्रवास करता येणार आहे. अ‍ॅप नागरिकांना अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयफोनच्या अ‍ॅप स्टोरवरून सहजरित्या डाऊनलोड करता येणार आहे.अ‍ॅपसाठी कोणतेही शुल्क नागरिकांना द्यावे लागणार नाही. अ‍ॅप इंटरनेट आणि जीपीआरएसवर चालणार आहे. जीपीएसच्या सहाय्याने महामेट्रो नागपूर आणि इतर सार्वजनिक वाहतूक संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. महामेट्रो आपल्या प्रवाशांसाठी यूजर फे्रंडली स्मार्टफोन मोबाईल अप्लिकेशन लॉन्च करण्यास सज्ज आहे.अ‍ॅप स्टोरवरून अ‍ॅप डाऊनलोड करताच अ‍ॅपवर देण्यात आलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना मेट्रोचे तिकीट सहज खरेदी करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे महाकार्डचे रिचार्जसुद्धा याच अ‍ॅपने करणे शक्य आहे. नेव्हिगेशनच्या माध्यमातून जवळच्या मेट्रो स्टेशनची आणि स्टेशनजवळच्या पर्यटन स्थळाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल.तसेच मेट्रो प्रवासाचे दर, मेट्रो मार्ग (रुट मॅप), नकाशा, मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक, पार्किंग इत्यादी संबंधित सर्व माहिती अ‍ॅपवर उपलब्ध असेल. याशिवाय महामेट्रोच्या सायकल, ई-सायकल, ई-रिक्षा, ई-स्कूटर, आॅटो-रिक्षा, टॅक्सी, बस व इतर सार्वजनिक वाहतूक संबंधित सर्व माहिती नागरिकांना या माध्यमाने सहज मिळेल.मल्टी मॉडेल इन्टिग्रेशनच्या (एमएमआय) माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने शहरात निर्माणाधीन नागपूर प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून, लवकर महामेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवेला सुरुवात करणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना सहज आणि सोयीस्कर प्रवास या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येईल. महामेट्रो नागपूर प्रकल्पातील प्रमुख घटकांपैकी एक मल्टी मोडल इन्टिग्रेशन किंवा फीडर सर्व्हिस नेटवर्क आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.

टॅग्स :Metroमेट्रो