शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या अपघातात वाहनचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:10 IST

नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचे अपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला.

ठळक मुद्दे डबल डेकर पुलावरून युवकावर पडला स्टील बार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचेअपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला.जखमी युवकाचे नाव प्रशांत शहाणे (३५) असून तो सीतारामनगर येथील रहिवासी आहे, तर दुसऱ्या बचावलेल्या युवकाचे नाव डॉ. राजेंद्र ठाकूर आहे.प्राप्त माहितीनुसार, प्रशांत शहाणे सोमवार रात्री ११ च्या सुमारास दुचाकी वाहनाने (एमएच-३१, ईटी ९३२४) छत्रपती चौकातून घरी जात होते. वर्धा रोडवर इंडसइंड बँकसमोरून जाताना अचानक मेट्रोच्या डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार प्रशांतच्या छातीला लागून गाडीच्या समोर पडला. त्यामुळे त्याचे संतुलन बिघडले आणि ते वाहनासह रस्त्यावर पडले. जखमी अवस्थेत प्रशांतने मोबाईलवरून मित्र आणि नातेवाईकाला घटनेची माहिती दिली. काही वेळात मित्र घटनास्थळी आले. यादरम्यान ते बºयाचवेळ घटनास्थळी होते. ये-जा करणारे वाहनचालक थांबून घटनेची माहिती जाणून घेत होते. या मार्गावर तब्बल एक तास वाहतूक थांबली होती. पण मेट्रोचा कुणीही अधिकारी जखमी प्रशांत शहाणे आणि डॉ. राजेंद्र ठाकूरची स्थिती जाणून घेण्यासाठी आला नाही. बºयाच वेळानंतर मेट्रो क्यूआरटीची माणसे आल्यानंतर त्यांना लोकांचा रोष सहन करावा लागला. अखेर या घटनेची माहिती प्रतापनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलीस आल्यानंतर लोकांचा रोष कमी झाला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.प्रकरणाची चौकशी सुरूमहामेट्रोच्या बांधकामादरम्यान सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येत असल्यामुळे अशा घटना होत नाहीत. परंतु, वर्धा रोडवर सोमवारी झालेली घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. महामेट्रो प्रशासन या घटनेची चौकशी करीत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर आवश्यक कारवाई करण्यात येईल. अखिलेश हलवे, डीजीएम (सीसी), महामेट्रो.

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघात