विद्यार्थ्यांंंनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
By Admin | Updated: June 6, 2014 00:56 IST2014-06-06T00:56:18+5:302014-06-06T00:56:18+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मैत्री परिवार संस्था आणि दादीभाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीद्वारे शालेय विद्यार्थ्यांंंनी वृक्ष

विद्यार्थ्यांंंनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
जागतिक पर्यावरण दिन : मैत्री परिवारतर्फे वृक्षदिंडी, विविध संस्थांनी दिला संतुलनाचा संदेश
नागपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मैत्री परिवार संस्था आणि दादीभाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीद्वारे शालेय विद्यार्थ्यांंंनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
या वृक्षदिंडीमध्ये १ हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मेंटेनन्स कमांड मुख्यालयाचे कमांड ऑफिसर ग्रुप कॅप्टन उपाध्याय आणि सुषमा उपाध्याय यांनी हिरवी झेंडी दाखविली. वृक्ष संवर्धनाचे नारे देत दिंडी दादीभाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल येथून सुरू होऊन गांधी गेट, नरसिंग टॉकीज, महाल चौक, बच्छराज व्यास चौक (बडकस चौक), चिटणवीस पार्कमार्गे, दादीभाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे परत आली. यावेळी पर्यावरण संरक्षणावर आधारित फिल्म दाखविण्यात आली. मैत्री परिवार संस्थेचे पर्यावरण विभाग प्रमुख सेवानवृत्त डीसीपी अरविंद गिरी यांनी पर्यावरण संरक्षणाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, मनोहर ग्रुपचे विष्णू मनोहर तसेच दादीभाई देशमुख हिंदू मुलींची शाळेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, मुख्याध्यापिका रेखा फडणवीस, सुरेश चव्हाण, संजय नखाते उपस्थित होते. अरुणा खंते यांनी संचालन केले.
विधी सेवा प्राधिकरण
प्राधिकरणाच्यावतीने न्यायमंदिर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा प्रभारी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण टी. एम. लालवाणी यांनी परिसरात वृक्षारोपण केले.
यावेळी प्राधिकरणाचे प्रभारी सचिव के. आर. पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाला प्राधिकरणाचे सदस्य अँड. पी. के. सत्यनाथन, अँड. एस. आर. गायकवाड, अँड संदीप डोंगरे, मोरेश्वर राऊत, प्रफुल्ल बोंडे, वर्षा रामटेके, स्वप्नील आसोलकर, विठ्ठल शिराळ, आशीष नारनवरे, विहार रामटेके उपस्थित होते.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पेंटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत १२५ विद्यार्थ्यांंंनी सहभाग घेऊन पर्यावरण या विषयावर आकर्षक चित्र रेखाटून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाला मनपा आयुक्त श्याम वर्धने, संस्थेच्या संस्थापिका डॉ. कविता रतन, प्रकाश उराडे, एन. बी. श्रीखंडे, मोहम्मद इसराईल आदी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांंंंना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन कौस्तुभ चॅटर्जी यांनी केले. सहभागी स्पर्धकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था
संस्थेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ उद्गीरकर, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पा मडावी उपस्थित होत्या. यावेळी ए. के. दास, पी. एन. रामटेके, ए. एच. वाघमारे, राजेश मानम, सुनिता शर्मा, अभिजित मुजूमदार, बन्सपाल बिसेन, राजेश नानोटी, कार्तिक मडावी उपस्थित होते.
धम्मदीप बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ
मंडळाच्यावतीने यादवनगर येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी पर्यावरणाबाबत माहिती दिली. यावेळी रमेश जनबंधू, चंद्रशेखर केने, अतुल रंगारी, सुनील धामगावे, वंदना साखरे, अनिता अंबादे, अविनाश लाडे, मुकेश कश्यप, सुनील शंभरकर, नामदेव हिरुळकर, अशोक चिमणकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)