शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

गुणवंत विद्यार्थ्यांची धाव नामांकित महाविद्यालयांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:29 AM

अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील नामांकित महाविद्यालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देबायफोकलची अंतिम यादी जाहीर राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील नामांकित महाविद्यालयात धाव घेतली. दहावीत ९९.२ टक्के गुण मिळवून विदर्भात प्रथम आलेल्या मैत्रेयी घनोटे हिने डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये फिशरीत प्रवेश मिळविला आहे. तर शहरातून गुणवत्ता यादीत आलेल्या अनुजा सहस्रबुद्धे हिने सुद्धा आंबेडकर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविला आहे. यावषीर्ही नामवंत महाविद्यालयांचा कट ऑफ ९७ टक्क्यावर गेला आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे ८ जून रोजी निकाल जाहीर केला. त्यापूर्वीच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. मात्र यंदा दहावीच्या निकालात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच ९० टक्क्यांच्यावर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. त्यामुळे यंदा द्विलक्षी अभ्यासक्रमाचा कट ऑफमध्ये सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसेल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत द्विलक्षीचे प्रवेशासाठी मंगळवारी २ हजार ७८६ विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली. यापैकी ८२४ विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केले. यात शहरातील नामवंत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. यावर्षी या महाविद्यालयांमध्ये ९८.४ टक्क्यापासून सुरू होऊन ९७.६० टक्क्यावर आले आहे. यामध्ये इलेक्ट्रानिक्स, फिशरीज आणि कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून आली. तर शिवाजी महाविद्यालयात असलेल्या ५० अनुदानित तुकडीसाठी ९७ टक्क्यांपर्यत कट ऑफ आला आहे. याच अभ्यासक्रमात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा कट ऑफ ९७.६ टक्क्यांवर असून कॉम्प्युटर सायन्समध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ ९६.६ टक्क्यांवर आहे.

२५ हजारावर विद्यार्थ्यांनी भरला भाग -२अकरावी प्रवेशाची प्रक्रिया निकालापूर्वीच सुरू झाली होती. १ जूनपासून विद्यार्थ्यांना भाग-१ भरायचे होते आणि निकालानंतर भाग-२ ची प्रक्रिया करायची होती. आतापर्यंत भाग-१ साठी ३३,९४० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे, तर भाग-२ साठी २५,७६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. आतापर्यंत सर्वाधिक १५,४५० अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत. तर वाणिज्यचे अर्ज ७,७४६, कला शाखेसाठी १८७७, एमसीव्हीसीसाठी २९५ व बायोफोकलसाठी ४,३८६ अर्ज आले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र