पारा घटतोय, पण रात्रीची थंडी कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:36+5:302021-02-11T04:09:36+5:30

नागपूर : फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी थंडीचा जोर कमी झालेला नाही. नागपुरातील थंडीचा पारा बुधवारी १ ...

The mercury is dropping, but the night is always cold | पारा घटतोय, पण रात्रीची थंडी कायमच

पारा घटतोय, पण रात्रीची थंडी कायमच

नागपूर : फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी थंडीचा जोर कमी झालेला नाही. नागपुरातील थंडीचा पारा बुधवारी १ अंशाने उतरला असला तरी, रात्री थंडीचा जोर मात्र कायमच आहे.

नागपुरातील किमान तापमानाचा पारा मंगळवारपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढला आहे. बुधवारी तापमान ११.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे सायंकाळी वातावरणातील थंडी कमी जाणवेल, अशी अपेक्षा होती. मात्र सायंकाळ होताच थंडी जाणवणे सुरू झाले. यामुळे दिवसा ऊन आणि रात्री थंडी असा अनुभव यंदा फेब्रुवारी महिन्यात येत आहे. बुधवारी शहरातील आर्द्रता सकाळी ४६ टक्के होती, तर सायंकाळी ८ वाजता २७ टक्के झाली. यावरून वातावरणातील थंडीचा परिणाम सहज लक्षात येण्यासारखा आहे. दृश्यता ४ ते १० किलोमीटर होती.

गोंदियातील तापमान विदर्भात सर्वात कमी १०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर यवतमाळ आणि वाशिमचे तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गडचिरोलीतही ११ अंश किमान तापमान असल्याने गारवा होता. चंद्रपुरातील पारा मात्र ११.८ अंशावर होता.

Web Title: The mercury is dropping, but the night is always cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.