शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! निवासी शाळेत मतिमंद मुलीचा विनयभंग, तीन दिवसानंतर प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 14:17 IST

संतप्त पालकांनी केली तोडफोड, शाळेत तणाव : आरोपीला अटक

नागपूर : निवासी शाळेत एका मतिमंद अल्पवयीन विद्यार्थिनीचा कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस येताच अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी निवासी शाळेत गोंधळ घातला. तसेच सोबत आलेल्या लोकांनी तेथे तोडफोड केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी कर्मचारी एकनाथ जंजेवार (२८) याला अटक केली.

पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी जयताळा येथील निवासी शाळेत तीन महिन्यांपासून राहत होती. विनयभंगाची घटना ८ डिसेंबरच्या रात्री घडली. जेवण झाल्यानंतर आरोपी कर्मचाऱ्याने इतर विद्यार्थिनींना जाऊ दिले व त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने आक्षेपार्ह वर्तन केले. मुलीने रविवारी पालकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालक व त्यांचे परिचित निवासी शाळेत पोहोचले. शिक्षकांनी पोलिसात तक्रार करण्याऐवजी ही घटना दडपल्याचा आरोप करत त्यांनी घोषणाबाजी केली. शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे लोकांनी वस्तू फेकून गोंधळ घातला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना तोडफोड केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु नातेवाईकांनी आरोपीचे कृत्य सांगितल्यानंतर पोलिसांनी एकनाथविरुद्ध गुन्हा दाखल करणे योग्य मानले. एमआयडीसी पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एकनाथला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSchoolशाळाnagpurनागपूर