ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांचे स्थायी नोकरीसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:45 IST2020-06-25T20:27:45+5:302020-06-25T22:45:24+5:30
महापालिकेतील अस्थायी आणि ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नोकरी देण्यासह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस (इंटक) तर्फे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांना निवेदन देण्यात आले.

ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांचे स्थायी नोकरीसाठी निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील अस्थायी आणि ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नोकरी देण्यासह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस (इंटक) तर्फे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांना निवेदन देण्यात आले.
महापालिकेत सफाई कर्मचारी अनेक वर्षांपासून अस्थायी स्वरूपात सेवा देत आहेत. त्यांना स्थायी नोकरीचे पत्र द्यावे. याशिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव भगत यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष शत्रुघ्न महतो, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरनार, शहर महासचिव विजय मधुमटके, जिल्हा महासचिव संतोष मकरंदे, शहर कार्याध्यक्ष कृष्णा तांबे, आशु गायकवाड आदी या शिष्टमंडळात उपस्थित होते.