शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

नागपूर जि.प.च्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:11 IST

Nagpur ZP Membership canceled सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषदेत नामप्र प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : १६ जागांसाठी निवडणूक आयोग करणार लवकरच कार्यक्रम जाहीर

 लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषदेत नामप्र प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यासंदर्भात ९ मार्चपूर्वी सदस्यांना कळवावे व त्याचा अहवाल आयोगाला पाठवावा, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. त्याचबरोबर आयोगाने १६ रिक्त जागांवर निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच देण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षणाची टक्केवारी ५० वर गेली होती. यासंदर्भात दाखल याचिकांवर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण कायम ठेवून ओबीसींचे आरक्षण ५० टक्क्यांमध्ये बसवावे असे राज्य सरकारला आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यावर निवडून आलेल्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. शुक्रवारी आयोगाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचित केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांसह राष्ट्रवादी व भाजपाच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन केली. सुनील केदार यांचे खंदे समर्थक मनोहर कुंभारे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा दिली. या निर्णयामुळे काँग्रेसेचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसच्या ७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. भाजप जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसला. अनिल निधान यांची विरोधीपक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यांना सुद्धा या निर्णयाचा फटका बसला. भाजपच्याही ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांच्यासह ३ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. शेकापच्या समीर उमप यांनाही त्याचा फटका बसला आहे.             सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्ह्यात ओबीसीच्या चार जागा अतिरिक्त होत आहे. पण आयोग १६ ही रिक्त जागांवर निवडणुका घेणार आहे. निवडणुकीबाबत आयोगाकडून स्वतंत्रपणे कार्यक्रम जारी करण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

जिल्ह्यातील कळमेश्वर, सावनेर, रामटेक, हिंगणा, उमरेड व भिवापूर पंचायत समितीतील १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या समित्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५७ टक्क्यांपासून ८० पर्यंत गेली होती. त्यामुळे ओबीसीच्या ८ जागा आयोगाने अतिरिक्त ठरविल्या आहे.

 तर होऊ शकतो सत्तापलट

जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने १६ नामप्रच्या जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या १६ मध्ये काँग्रेसचे ७ सदस्य आहे. शिवाय अनुसूचित जमाती प्रवर्गातील काँग्रेसच्या दोन सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र ठरण्याची वेळ आली आहे. अशा ९ सदस्यांचा फटका काँग्रेसला बसणार आहे. फेर निवडणुकीत काँग्रेसने रिक्त झालेल्या जागा गांभीर्याने न घेतल्यास आणि भाजप ताकदीने रिंगणात उतरल्यास सत्तापालट होतांना वेळ लागणार नाही. काही जुने संदर्भही सत्तापरिवर्तनाला कारणीभूत ठरू शकतात.

सदस्यत्व रद्द झालेले राजकीय पक्षाचे सदस्य

काँग्रेस

मनोहर कुंभारे (केळवद)

ज्योती शिरसकर (वाकोडी)

अर्चना भोयर (करंभाड)

योगेश देशमुख (अरोली)

अवंतिका लेकुरवाळे (वडोदा)

ज्योती राऊत (गोधनी रेल्वे)

कैलास राऊत (बोथिया पालोरा)

 राष्ट्रवादी काँग्रेस

देवका बोडके (सावरगाव)

पुनम जोध (भिष्णूर सर्कल)

चंद्रशेखर कोल्हे (पारडसिंगा)

सुचिता ठाकरे (डिगडोह)

 भाजपा

अनिल निधान (गुमथळा)

राजेंद्र हरडे (नीलडोह)

अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी)

भोजराज ठवकर (राजोला)

 शेकाप

समीर उमप (येनवा)

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरreservationआरक्षण