संजय गांधी निराधार याेजनेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:12+5:302021-02-13T04:10:12+5:30
पारशिवनी : स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात संजय गांधी निराधार अनुदान याेजनेच्या सदस्यांची सभा नुकतीच पार पडली. त्यात पारशिवनी तालुका ...

संजय गांधी निराधार याेजनेची सभा
पारशिवनी : स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात संजय गांधी निराधार अनुदान याेजनेच्या सदस्यांची सभा नुकतीच पार पडली. त्यात पारशिवनी तालुका समितीच्या नवीन पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
या समितीच्या अध्यक्षपदी पारशिवनी नगर पंचायतचे नगरसेवक दीपक शिवरकर यांची तर समितीच्या सदस्यपदी प्रेम भोंडेकर, गजानन गजभिये, रोहिणी निंबाळकर, भीमराव कळमकर, दिनेश आदेवार, मंगेश बालगोटे, गोपाळ केळवदे, सचिन आमले, निकेश भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले. या सभेला नवनियुक्त सदस्यांसह नागपूर जिल्हा सरपंच संघटनेचे सरचिटणीस बलवंत पडोळे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दियेवार, तालुका महिला सरपंच संघटनेच्या अध्यक्षा व आमडीच्या सरपंच शुभांगी भोस्कर, पारशिवनी नगर पंचायतचे नगरसेवक विजय भुते, राहुल ढगे, राजू भोस्कर, रोशन पिंपरामुळे, टिकाराम परतेकी उपस्थित हाेते. समाजातील निराधार नागरिकांना या याेजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दीपक शिवरकर यांच्यासह सदस्यांनी दिली. यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असून, ही प्रक्रिया सुकर करण्यात येणार अल्याचेही त्यांनी सांगितले.