शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:56 IST

वाहतूक व्यवस्था मजबूत करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी होण्याचा प्रशासनाचा अंदाज असून सरकारी पातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकला जोडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास करत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर राहणार आहे. राज्य शासन व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सखोल मंथन करण्यात आले.

प्रयागराज येथील महाकुंभात रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. नाशिकच्या कुंभमेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खा. स्मिता वाघ, आ.देवयानी फरांदे, आ.मंगेश चव्हाण व इतर प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाशिकला मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

नाशिक रिंगरोडला मंजूर

या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक मार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्याने द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या मार्गांचा होणार विकास

- घोटी - पाहिने - त्रिंबकेश्वर - जव्हार फाटा- द्वारका सर्कल - सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे - कोल्हार- नाशिक ते कसारा- सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी - शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)- नाशिक ते धुळे- त्र्यंबकेश्वर - जव्हार - मनोर- सावली विहीर - मनमाड - मालेगाव-घोटी - सिन्नर - वावी - शिर्डी- शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) - अहिल्यानगर (खरवंडी फाटा)

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरी