शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नागपूर विभागातील मध्यम आणि लहान तलावही ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:36 AM

मागील काही दिवसात नागपूर व परिसरासह मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणे भरली आहेत.

ठळक मुद्दे३७३ पैकी २६१ भरली६ मोठे, २४ मध्यम, २३१ मामा व लघु तलावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसात नागपूर व परिसरासह मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणे भरली आहे. विभागात लहान, मोठी अशी एकूण ३७३ तलाव आहेत. यापैकी २६१ तलाव पूर्ण भरले आहे. यामध्ये ६ मोठे प्रकल्प, २४ मध्यम तर २३१ लघु व मामा तलावांचा समावेश आहे.नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सध्या २४ प्रकल्प पूर्ण भरली आहे. जिल्हानिहाय विचार केल्यास नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकारची तलावं आहेत. यापैकी चंद्रभागा, उमरी, कन्होलीबारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, जाम आणि कार अशी ८ तलाव १०० टक्के भरली आहेत. एकूण तलावांची तुलना केल्यास ८३.४८ टक्के भरली आहेत. भंडारा जिल्ह्यातील एकूण ४ मध्यम तलावांपैकी चांदपूर हे १०० टक्के भरले. तर बधेडा हे ८३.९५ टक्के भरले आहे. एकूण ८४.४२ टक्के तलाव भरली आहेत. गोंदिया जिल्ह्यात १० मध्यम तलाव आहेत. यापैकी रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी हे तलाव १०० टक्के भरले आहेत. तर बोदलकसा ९३.१६ टक्के, उमरझरी ९४.४९ टक्के, कालपाथरी ९०.५९ टक्के भरली आहेत. एकूण प्रकल्प ८०.२२ टक्के भरले आहेत. वर्धा जिल्ह्यात ५ मध्यम स्वरूपातील तलाव आहेत. यापैकी लालनाल, मदन उन्नेयी, डोंगरगाव व पंचधारा तलाव १०० टक्के भरली. आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ८ मध्यम स्वरूपाचे तलाव असून यापैकी घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, अमलनाला, पकडीगुड्डम आणि डोंगरगाव ही सर्व तलावे १०० टक्के भरली आहेत. मध्यम तलावांचा एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.४८ दलघमी आहे. यात आजच्या घडीला ४७३.३० दलघमी म्हणजे ८८.०६ टक्के पाणी जमा झाले आहे. विभागात एकूण ३१४ लघु व मामा तलाव आहेत. यापैकी २३१ तलाव काठोकाठ भरली आहेत.मोठे प्रकल्प ८०.४० टक्के भरलेनागपूर विभागातील मोठे प्रकल्प ८०.४० टक्के इतके भरले आहेत. विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३५५२.३६ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला २८५५.९४ दलघमी म्हणजे ८०.४० टक्के पाणी जमा झाले आहे. यामध्ये इटियाडोह, असोलामेंढा, दिना, धाम, पोथरा ही पाच धरणे १०० टक्के भरली आहेत. तर तोतलाडोह ९६.९२ टक्के, खैरी ९७.९७ टक्के, वणा ९२.८६ टक्के, पुजारी टोला ९३.४३ टक्के, कालीसरार ९०.६९ टक्के, लोअर वर्धा ९१.१६ टक्के भरली आहेत.

टॅग्स :Waterपाणी