शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

मेडिट्रीना हॉस्पिटलच्या भागीदाराला डॉक्टरची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपसातील मतभेद दूर करून तोडगा काढण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत डॉ. समीर पालतेवार यांनी त्यांचे ...

ठळक मुद्देसमेटासाठी बोलविलेल्या बैठकीत वाद : सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपसातील मतभेद दूर करून तोडगा काढण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत डॉ. समीर पालतेवार यांनी त्यांचे भागीदार गणेश रामचंद्र चक्करवार यांना मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली. मेडिट्रीना हॉस्पिटलच्या मिटींग रूममध्ये शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. सीताबर्डी पोलिसांनी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून डॉ. समीर पालतेवार यांच्याविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये नोंद केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मेडिट्रीना हॉस्पिटलचा वाद सर्वत्र चर्चेला आला आहे.सीताबर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चक्करवार आणि डॉ. समीर पालतेवार हे मेडिट्रीना हॉस्पिटलचे भागीदार असून, यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. डॉ. पालतेवार यांनी पदाचा गैरवापर करून लाखोंचा घोळ केल्याची तक्रार चक्करवार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. पोलिसांनी हे प्रकरण थंडबस्त्यात टाकल्याने कोर्टातून दाद मागण्यात आली. कागदपत्रांच्या आधारे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, अखेर दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत अटक करण्याचे टाळले. दोन पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती. दरम्यान, हे प्रकरण आता शांत झाल्यासारखे वाटत असताना चक्करवार आणि पालतेवार यांच्याशी मैत्री असणाऱ्यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याच्या संबंधाने शनिवारी दुपारी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला डॉ. पालतेवार, त्यांच्या पत्नी, सचिव गंधेवार, तसेच चक्करवार आणि त्यांचे मित्र बसले होते. समेटासाठी बोलविलेल्या या बैठकीत प्रारंभीपासूनच डॉ. पालतेवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने चक्करवारसोबत त्यांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. समेट होणार नाही, हे लक्षात आल्याने चक्करवार यांनी बैठकीतून बाहेरचा मार्ग धरला. त्यांच्या मागोमाग आलेल्या डॉ. पालतेवार यांनी चक्करवार यांना मारहाण केली. अश्लील शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. त्यामुळे चक्करवार सरळ सीताबर्डी ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीची सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. पवार यांनी कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये नोंद केली.डॉ. पालतेवारांचा नो रिप्लाय !या संबंधाने माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. पालतेवार यांच्याकडे लोकमत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल