शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औषध व्यावसायिकांची विम्याच्या पूर्ततेसाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:30 IST

मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.

ठळक मुद्देआगीत नुकसान झालेले व्यापारी हतबल : कंपन्यांकडून वेगवेगळ्या दस्तावेजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.संदेश दवा बाजाराला आग लागल्यानंतर औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. आग लागून चार दिवस झाल्यानंतरही औषधांची दुकाने सुरू झालेली नाही. शासनाच्या विविध यंत्रणेकडून कारवाया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने तपासण्या सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून वेगळी कारवाई सुरू आहे. पोलिसांचे पंचनामे सातत्याने सुरू आहे. दुसरीकडे करोडो रुपयांचा औषधांचा साठा खाक झाल्याने व्यापारी वेगळ्या चिंतेत आहे. अशात काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमाही उतरविला होता. त्यांना विमा कंपन्यांकडून विम्याची पूर्तता होईल, अशी अपेक्षा होती. घटनेनंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पाच पाच वेळा चौकशीसाठी घटनास्थळी आले. घटनास्थळाचे निरीक्षण करून गेल्यानंतर २० ते २५ प्रकारचे वेगवेगळे दस्तावेज उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांना केली. विशेष म्हणजे काही व्यापाऱ्यांच्या दुकांनाची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. त्यांच्याजवळील दस्तावेज सुद्धा यात नष्ट झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांकडून मागणी करण्यात येणाऱ्या दस्तावेजाची पूर्तता कशी करणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या आगीत १०० टक्के नुकसान झालेल्यांमध्ये पुनित मेडिकल, विजय मेडिकोज, सिद्धाविनायक मेडिकल, दयाल ट्रेडलिंक, साहू मेडिकल, साईमीरा एजन्सीज नावाने १० ते १२ व्यापारी आहे.आगीत नुकसान झालेल्या ६० टक्के व्यापाऱ्यांनी विमा उतरविला आहे तर ४० टक्के व्यापाऱ्यांनी विमा काढला नाही. ज्यांनी विमा काढला नाही अशा व्यापाऱ्यांना बिंल्डींगचे बांधकाम केलेल्या बिल्डरने २० टक्के नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. पण ज्या व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे विमा काढला, त्या व्यापाऱ्यांचा छळ विमा कंपन्या करीत आहे. व्यापारी झालेल्या नुकसानाने हतबल झाल्या असून, शासनाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शासनाने विमा कंपन्यांवर अंकुश ठेवून व्यापाऱ्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.

टॅग्स :fireआगmedicinesऔषधंbusinessव्यवसाय