शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नागपुरात मेडिकल रुग्णांना मिळणार १० रुपयात जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 9:57 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. येथे येणारे रुग्ण बहुसंख्य गरीब असतात. या रुग्णांसोबतच त्यांची सुश्रुषा करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून युवा झेप प्रतिष्ठानतर्फे १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ठळक मुद्देयुवा झेप प्रतिष्ठानचा पुढाकाररुग्णांच्या नातेवाईकांचाही जेवणाचा प्रश्न सुटणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. येथे येणारे रुग्ण बहुसंख्य गरीब असतात. या रुग्णांसोबतच त्यांची सुश्रुषा करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून युवा झेप प्रतिष्ठानतर्फे १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.गरीब रुग्णांसाठी मेडिकल हे आशेचे किरण आहे. रुग्णातील सोयी, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. परिणामी, दोन हजार रुग्णांची ‘ओपीडी’ तीन हजारांवर गेली आहे. आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढली आहे. गरीब रुग्णांच्या नाश्त्यासह दोन वेळच्या जेवणाची सोय शासनाकडून केली जाते. मात्र, रुग्णांसोबत येणाºया नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था राहत नाही. अनेक रुग्ण दोन दिवसांपासून ते महिनाभर उपचारासाठी असतात. अशावेळी नातेवाईक अडचणीत येतात. काही सामाजिक संस्था यांच्यासाठी नि:शुल्क जेवण पुरवितात. परंतु नातेवाईकांची संख्या पाहता यालाही मर्यादा पडतात. दररोजच्या जेवणाचा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. यामुळे काही जण मेडिकल परिसरातच चूल पेटवून स्वयंपाक करतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जेवण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटावा म्हणून संदीप जोशी यांनी युवा झेप प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ‘पं. दीनदयाल थाळी’ नावाने मेडिकल परिसरात प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता खा. अजय संचेती यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ. सुधाकर कोहळे, आ. ना. गो. गाणार, रमेश मंत्री, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित राहतील.रोज १००० लोकांच्या जेवणाची व्यवस्थामेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा प्रकल्प सुरू होणार आहे. येथे रोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत एक हजार गरजू रुग्णांच्या नातेवाईकांकरिता अवघ्या १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध होईल. या थाळीत तीन पोळ्या, भाजी व भात राहील. युवा झेप प्रतिष्ठानने यापूर्वी धंतोली व रामदासपेठ भागातही ‘दीनदयाल लंच बॉक्स’ उपलब्ध करून दिला आहे.कोणीही उपाशी राहू नयेगरीब व गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत जेवण देण्याचा प्रकल्प प्रायोगिकस्तरावर धंतोली येथे सुरू केला. परंतु या प्रकल्पाचा खरा उपयोग मेडिकलमध्ये मोठ्या संख्येत येणाऱ्या गरिबांसाठी व्हावा असे विचार नागपुरातील सहृदय लोकांनी मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी सांगितले असता त्यांनी तत्काळ मेडिकलच्या परिसरात जागा उपलब्ध करून दिली. या प्रकल्पामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न मिटणार आहे. कुणी उपाशी राहू नये हीच या प्रकल्पामागची भूमिका आहे.संदीप जोशीज्येष्ठ नगरसेवक

 

टॅग्स :foodअन्न