शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल, मेयोचे डॉक्टर संपावर

By admin | Updated: April 8, 2016 02:43 IST

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर रविवारपासून संपावर आहेत.

नागपूर : जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर रविवारपासून संपावर आहेत. आता मेडिकल व मेयोच्या निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात उडी घेत शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून ‘मास बंक’वर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. जे.जे. रुग्णालयाच्या नेत्र रोग विभागाच्या प्रमुख शस्त्रक्रिया करू देत नाहीत, सतत अपमान करतात, असा या विद्यार्थ्यांचा दावा असून दुसरीकडे रुग्णांवर उपचार करताना हेळसांड केल्याने चौकशी सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्याला लक्ष्य केल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे या प्रकरणी दाद मागितली असून दोन्ही डॉक्टरांना तत्काळ हटविण्याच्या मागणीसाठी रविवारपासून आंदोलनाची हाक दिली आहे. ‘सेंट्रल मार्ड’ने मंगळवारी यात सहभागी होऊन आम्ही त्यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले. गुरुवारी सायंकाळी मेडिकल व मेयोच्या ‘मार्ड’ने शुक्रवारी सकाळ पासून ‘मास बंक’वर जात असल्याचे पत्र दोन्ही अधिष्ठात्यांना दिले. मेडिकलमधील जवळपास ४५० तर मेयोतील जवळपास २०४ निवासी डॉक्टर असे एकूण ६५४ डॉक्टर संपावर जाणार आहेत. केवळ अपघात विभागात निवासी डॉक्टर आपली सेवा देतील. सोमवारीपर्यंत संप मिटेल, असा विश्वास मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)