शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

एमसीआयच्या पथकाकडून मेडिकलची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसच्या २०० जागांबाबत ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने सोमवारी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चार डॉक्टरांच्या या पथकाने सकाळी ९ वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत बाह्यरुग्ण विभागापासून ते आंतररुग्ण विभाग, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, एवढेच नव्हे तर सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांनंतर ‘एमसीआय’च्या पथकाकडून मेडिकलची तपासणी होत आहे.

ठळक मुद्देएमबीबीएसच्या २०० जागांसाठी पाहणी : सकारात्मक अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसच्या २०० जागांबाबत ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने सोमवारी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चार डॉक्टरांच्या या पथकाने सकाळी ९ वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत बाह्यरुग्ण विभागापासून ते आंतररुग्ण विभाग, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, एवढेच नव्हे तर सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांनंतर ‘एमसीआय’च्या पथकाकडून मेडिकलची तपासणी होत आहे.नागपूर मेडिकल महाविद्यालयाकडून दरवर्षी एमबीबीएसच्या २०० जागा भरल्या जातात. या जागेला घेऊन ‘एमसीआय’चे जे निकष आहेत, ते पाळले जातात का, हे पाहण्यासाठी हे पथक येते. गेल्या महिनाभरापासून या पाहणीला घेऊन मेडिकल प्रशासन कामाला लागले होते. पथक आकस्मिक येणार असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली होती. सोमवारी सकाळी ९ वाजता डॉ. डी.डी. दत्तारॉय, डॉ. कविता राजरतन, डॉ. जुगलकिशोर कार व डॉ. ए.के. पांडे या चार सदस्यीय एमसीआय पथकाने अधिष्ठाता कार्यालयाला भेट दिली. तेथून पथकातील या चार डॉक्टरांनी वेगवेगळी पाहणी केली. यात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, विविध वॉर्ड, शस्त्रक्रियागृह, ट्रॉमा केअर सेंटर, आंतररुग्ण विभाग, विद्यार्थ्यांचे क्रीडांगण, स्वयंपाकगृह, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी केली.बाह्यरुग्ण विभागात तीन हजारावर रुग्णांची गर्दी, खाटांच्या तुलनेत ९१ टक्के भरती असलेले रुग्ण, अद्यावत असलेली शस्त्रक्रियागृहे, वसतिगृहातील वातानुकूलित अभ्यास कक्ष, महाविद्यालयातील लेक्चरर्स हॉल व अपेक्षित असलेले मनुष्यबळ पाहून पथक सकारात्मक अहवाल देतील, अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे, दरम्यानच्या काळात मेडिकलमध्ये पहिल्यांदाच पहिल्या दिवसाचे ‘एमसीआय’चे निरीक्षण विना गोंधळ सुरळीत पार पडले. याचे श्रेय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दिले जात आहे.२५० जागांसाठी प्रयत्न!मेडिकलमध्ये आवश्यक पायाभूत सोयी, यंत्रसामुग्री, रुग्णांची संख्या व उपलब्ध मनुष्यबळ पाहता एमबीबीएसच्या २०० वरून २५० जागांसाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी चर्चा आज वैद्यकीय शिक्षकांमध्ये होती. असे झाल्यास, वैद्यकीय क्षेत्राचे स्वप्न बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल, सोबतच डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णांना मदत मिळेल, असे बोलल्या जात आहे.मेडिकलमधील शिक्षकांची स्थितीप्राध्यापक ३५सहयोगी प्राध्यापक १०६सहायक प्राध्यापक १७०वरिष्ठ निवासी डॉक्टर ८०कनिष्ठ निवासी डॉक्टर ४००

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर