मेडिकल चौक ते सरदार पटेल चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST2021-02-26T04:08:05+5:302021-02-26T04:08:05+5:30

मेडिकल चौक ते सरदार पटेल चौक रस्ता २१ मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Medical Chowk to Sardar Patel Chowk | मेडिकल चौक ते सरदार पटेल चौक

मेडिकल चौक ते सरदार पटेल चौक

मेडिकल चौक ते सरदार पटेल चौक रस्ता २१ मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प टप्पा क्रमांक ३ मधील मेडिकल कॉलेज चौक ते सरदार पटेल(ग्रेट नाग रोड)पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करणे प्रस्तावित आहे. या कामाकरिता २५ फेब्रुवारी ते २१ मेपर्यंत संबंधित रस्ता संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्गमित केले आहेत.

या रस्त्यावरील वाहतूक मेडिकल चौक ते आशीर्वाद चौक मार्गे वळविण्यात येणाार आहे. कामाच्या ठिकाणी सूचना फलक, काम सुरू केल्याची, काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करण्यासोबतच कंत्राटदाराने स्वत:चा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला फलक लावण्याचेही निर्देशित केले आहे. या आदेशाच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कंत्राटदाराने काय करावे, याबाबतही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: Medical Chowk to Sardar Patel Chowk