शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

नागपूर आणि वर्धा स्थानकावर प्रवाशांना माफक दरात जेवण

By नरेश डोंगरे | Updated: April 25, 2024 19:57 IST

२० आणि ५० रुपयांत मिळते जेवण : विदर्भातील अन्य स्थानकांवर लवकरच सुविधा

नागपूर : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या सहकार्याने मध्य रेल्वेकडून प्रवाशांना माफक दरात चांगल्या प्रतिचा नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून देणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर आणि वर्धा स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच अन्य स्थानकांवरही ही सेवा-सुविधा सुरू केली जाणार आहे.

उन्हाळ्यात अनेक रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होते. खासकरून जनरल डब्यातील गर्दीत मोठी वाढ होते. हे प्रवासी रेल्वे स्थानकावर किंवा गाड्यांमध्ये मिळेल तो नाश्ता, जेवण घेऊन आपली भूक भागवितात. काही अनधिकृत विक्रेते गर्दी पाहून नाश्ता, खाद्य पदार्थांची किंमत वाढवून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करतात. ते लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात चांगले जेवण आणि नाश्ता उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, केवळ २० रुपयांत आणि ५० रुपयांत नाश्ता तसेच जेवणाचे दोन पर्याय रेल्वेने प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहे. सध्या नागपूर आणि वर्धा रेल्वे स्थानकांवर हे ऊंटर सुरू करण्यात आले आहे.

कोचच्या खिडक्यांजवळून घेता येणार जेवणमहिला, ज्येष्ठ नागरिकांना नाश्ता, जेवण विकत घेण्यासाठी गाडीतून चढण्या-उतरण्याची कसरत करावी लागू नये म्हणून प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या (सामान्य श्रेणीचे डबे) जवळ हे काउंटर सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. अर्थात, खिडकीजवळ असलेल्या या काउंटरवरून प्रवासी त्यांचा नाश्ता, जेवण आणि पाणी खरेदी करू शकतात. दूरवर असलेल्या खाद्य पदार्थांचे स्टॉल शोधण्याची किंवा स्टेशनच्या बाहेर धावपळ करण्याची गरज प्रवाशांना भासणार नाही.

गेल्या वर्षीचा उपक्रम यशस्वीमध्य रेल्वेने गेल्या वर्षी अशा प्रकारे स्वस्त दरात ठिकठिकाणच्या ५१ स्थानकांवर नाश्ता आणि जेवणाची सुविधा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे यावेळी मध्य रेल्वेने आता १०० हून अधिक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा आणखी काही स्थानकांवर लवकरच विस्तार करण्याची योजना विचाराधिन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे