शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

नागपुरात एमडी तस्करांनी घेतली पाच पोलिसांची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:06 IST

अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देअटक आणि पीसीआर : वरिष्ठांनी केले निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडीही मिळवण्यात आली.चार महिन्यांपासून सलग सणोत्सव आणि निवडणुकीच्या बंदोबस्ताचा ताण घेऊन कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण करणारे हे प्रकरण १९ ऑक्टोबरला चर्चेला आले होते. उपरोक्त आरोपी पोलीस कर्मचारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत (डीबी स्कॉड) कार्यरत होते. १४ ऑक्टोबरला दुपारी ते सर्व नंदनवन परिसरात गस्तीवर असताना त्यांना जमाल शेख नामक अंमली पदार्थाचा तस्कर दिसला. त्याला ताब्यात घेऊन या पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे ३४ ग्राम एमडी पावडर आढळले. यावेळी आरोपी जमाल पळून गेला. तर काही वेळेनंतर जमालचा साथीदार जावेद अली या पोलिसांना रमणा मारोती चौकात भेटला. तेथे जमालचा शोध न घेण्याची मांडवली झाली. त्याबदल्यात जावेदने २ लाख, ४० हजार रुपये पोलिसांच्या हातात कोंबले. या पाचही पोलिसांनी ती रोकड तसेच एमडी पावडर घेऊन मौनीबाबांची भूमिका स्वीकारली. मात्र, पाच दिवसांनंतर पोलिसांच्या मांडवलीचा भंडाफोड झाला. यानंतर एसीपी विजय धोपावकर यांनी १९ ऑक्टोबरला नंदनवन ठाण्यात जाऊन चौकशी केली. हवालदार सचिन एम्प्रेडीवारच्या कपाटाची झडती घेतली असता त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि २ लाख, ४० हजारांची रोकड आढळली. ती जप्त करून सोमवारी सायंकाळी या संबंधाने उपरोक्त पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरण एनडीपीएसकडेया गंभीर प्रकरणात पोलीस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या (एनडीपीएस) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. दरम्यान, वरिष्ठांनी हा तपास एनडीपीएसकडे सोपविला. मंगळवारी या पाचही आरोपींना निलंबित करण्यात आले. या घडामोडीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. यापूर्वी एमडीचा कुख्यात तस्कर आबू याला मदत करण्याच्या आरोपावरून शहर पोलीस दलातील दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले होते, हे विशेष !मात्र, पाच दिवसांनंतर पोलिसांच्या मांडवलीचा भंडाफोड झाला. यानंतर एसीपी विजय धोपावकर यांनी १९ ऑक्टोबरला नंदनवन ठाण्यात जाऊन चौकशी केली. हवालदार सचिन एम्प्रेडीवारच्या कपाटाची झडती घेतली असता त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि २ लाख, ४० हजारांची रोकड आढळली. ती जप्त करून सोमवारी सायंकाळी या संबंधाने उपरोक्त पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्य आरोपीलाही अटक या प्रकरणाचे मूळ असलेला एमडी तस्कर जमाल शेख याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या एनडीपीएसने अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. या सर्वांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्याकडून एमडी तस्करांच्या नव्या नेटवर्कची माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीPoliceपोलिसsuspensionनिलंबन