गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 06:10 IST2025-12-10T06:09:34+5:302025-12-10T06:10:40+5:30

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून १७ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

MCOCA will be imposed in the case of gutkha sale; Chief Minister Devendra Fadnavis announced in the Assembly: The law will be amended | गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार

गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार

नागपूर : गुटखा, मावा, सिगारेट, सुपारी, पान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधीत असून्, आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या माध्यमातून ड्रग्जचीही विक्री होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे यासंदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील. तसेच, त्यात अधिक सुधारणा करून अशा प्रकरणी मकोका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून १७ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. नवी मुंबईत १,१४४, अहिल्यानगर १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलढाणा ६३४, नागपूर ४९, यवतमाळ १,७०६ गुन्हे दाखल करण्यात आले. गुटखा विक्री थांबविण्यासाठी संयुक्त कारवाई पथकेही स्थापन करण्यात आली. अंमली पदार्थांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समिती अशा समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात व आजुबाजुच्या परिसरात दुकानांमध्ये नशाजन्य गोळ्या, चॉकलेट किंवा इतर काही खाद्यपदार्थांची मुलांना विक्री

होणार नाही, या अनुषंगाने नियमित पोलिस विभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात येत आहे. असे असले तरी अशी विक्री सुरूच असल्याने त्यावर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी कमकुवत कायदा अधिक कठोर व कडक करण्यासाठीचे निर्देश कायदा व विधी विभागाला सांगण्यात आले. मकोका लावतानाच त्यांच्यावर एनसीओसी करता येईल. यासोबतच अशाप्रकरणी दर्जेदार पुनर्वसन केंद्र तयार करण्याचेही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार रईस शेख यांनी भिवंडीत आजही मोठ्या प्रमाणात गुटखा व ड्रग्जची विक्री होत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर भिवंडीत विशेष कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. लोकप्रतिनिधींना माहिती देऊ

गुटखा विक्री थांबविण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले. ही माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात आली नाही. अशा पथकाची माहिती, पथकातील सदस्यांची नावे व तक्रार करावयाचा क्रमांक आदींची माहिती व फलक शाळेच्या परिसरात लावावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलिसांना तसे कळवून लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात येईल, असे सांगितले.\ ‘शक्ती’ कायद्यात सुधारणा होणार

मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेला शक्ती कायदा केंद्र सरकारने परत पाठवला आहे; कारण शक्ती कायद्यातील काही तरतुदी केंद्राच्या कायद्यांशी विसंगत आहेत. हा विसंवाद दूर करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करून, हा कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

Web Title : गुटखा बिक्री पर मकोका: मुख्यमंत्री फडणवीस ने कानून सुधारों की घोषणा की

Web Summary : महाराष्ट्र में गुटखा बिक्री पर मकोका लगेगा, क्योंकि इससे नशीले पदार्थों का व्यापार बढ़ रहा है। मौजूदा कानूनों को मजबूत किया जाएगा, और संयुक्त कार्य बल सक्रिय हैं। पुनर्वास केंद्रों को बेहतर बनाने के प्रयास जारी हैं। शक्ति अधिनियम में भी संशोधन की योजना है।

Web Title : MCOCA for Gutkha Sales: CM Fadnavis Announces Law Reforms

Web Summary : Maharashtra to impose MCOCA on gutkha sales due to rampant drug trade. Existing laws will be strengthened, and joint task forces are active. Efforts are underway to improve rehabilitation centers. Amendments to the Shakti Act are also planned.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.