कामठी शहरात माॅकड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:04+5:302021-02-13T04:10:04+5:30
कामठी : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था विचारात घेता कामठी पाेलिसांनी शहरातील बाबा अब्दुल्लाह शाह ...

कामठी शहरात माॅकड्रील
कामठी : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था विचारात घेता कामठी पाेलिसांनी शहरातील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाहसमोर माॅकड्रील केले. यात पाेलिसांनी प्रशासनाच्या विराेधात नारेबाजी करणाऱ्या आंदाेलकांना पांगविण्याचे माॅकड्रील केले.
गुरुवारी दुपारी १२ पासून पाेलीस कामठी शहरातील रेल्वेस्थानक मार्गावरील चित्तरंजन नगरात असलेल्या बाबा अब्दुल्लाह शाह दरगाहसमोर माेठ्या संख्येने गाेळा झाले हाेते. त्या ठिकाणी काही मंडळी प्रशासनाविराेधात नारेबाजी, तर काही जाळपाेळ करीत असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. शेवटी हा पाेलिसांचा माॅकड्रील असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. यासाठी आधी मार्गावरील दाेन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली हाेती. शिवाय, पाेलिसांच्या ताफ्यासह अग्निशमन दल व पाेलिसांची अतिरिक्त कुमक बाेलावण्यात आली हाेती. यावेळी आंदाेलकांना समजावण्यापासून तर लाठीमार करण्यापर्यंतचे प्रकार करण्यात आले. या माॅकड्रीलमध्ये सहायक पाेलीस आयुक्त राजीव पंडित, कामठी (नवीन) चे ठाणेदार संजय मेंढे, कामठी (जुनी) चे ठाणेदार विजय मालचे, कळमनाचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण, गुप्तवार्ता विभागाचे शैलेश यादव व गजभिये यांच्यासह पाेलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते. या माॅकड्रीलची चित्रफीतही करण्यात आली.