शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 23:46 IST

महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात, याचे स्मरणही त्यांनी मुंढे यांना करून दिले आहे.

ठळक मुद्देपत्र पाठवून करून दिले स्मरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात, याचे स्मरणही त्यांनी मुंढे यांना करून दिले आहे.महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आयुक्त मुंढे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनीही कन्टेन्मेंट झोन व क्वारंटाईन सेंटरवरून मुंढे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता महापौर संदीप जोशी यांनीही उघडपणे मुंढे यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. जोशी यांनी अलीकडेच आयुक्तांना पाठिवलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रशासनाची जबाबदारी जशी आयुक्त म्हणून आपली आहे तशीच या नगरीचा महापौर म्हणून माझीसुद्धा आहे. नागपूरच्या नागरिकांनी ती विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयमाच्या कलम ४ मध्ये प्राधिकरणाच्या बाबतीत नमूद केलेल्या स्पष्टतेबाबत आपण अवगत आहात, अशी मला अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रशासनाचे दोन चाके आहेत. त्याप्रमाणे आपण कार्य करावे, त्याप्रमाणे आपण वागावे, अशी भावनाही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.एमएलए होस्टेल क्वारंटाईन सेंटरमधील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन मुळीच करीत नाहीत, याची पूर्ण माहिती घेऊनच आपण बोललो. याचदरम्यान लोणारा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले लोक छतावर कसे एकत्र होते, याचा फोटो जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी छापला. हीच परिस्थिती आमदार निवासातीलही असू शकते. अशा प्रकारे क्वारंटाईन असलेल्या लोकांमुळे क्वारंटाईनची वाढती संख्या लक्षात घेता शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेवटी याला मनपा प्रशासनच जबाबदार असणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या नियंत्रणासाठी महापौर आणि आयुक्त हे मिळून काम करीत असल्याचे चित्र नागरिकांपुढे जाणे आवश्यक होते. परंतु ते होताना दिसून येत नाही आणि नजीकच्या काळात थांबेल असेही दिसत नाही, असा सूचक इशाराही जोशी यांनी मुंढे यांना दिला आहे.

मुंढेंना नागपुरात तीन महिनेही झाले नाहीत‘राजकारण करण्याची वेळ नाही,’ या वक्तव्याबाबत महापौरांनी आक्षेप घेत खेद व्यक्त केला. ‘मी या शहरात जन्मलो, या शहरानेच मला मोठे केले आणि या शहरातच मी मरणार. तुम्हाला तर या शहरात येऊन ३ महिनेही पूर्ण झाले नाहीत. तेव्हा मी आपणाशी राजकारण का करावे, असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढे