लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. याची दखल घेत ‘अॅक्शन मोड’वर आलेले महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी रस्त्यावर उतरले.
महापौर व आयुक्त ‘अॅक्शन मोड’वर : अनेक दुकानदारांना ठोठावला दंड
ठळक मुद्देनियम मोडणाऱ्यांवर ‘ऑन स्पॉट’ कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. याची दखल घेत ‘अॅक्शन मोड’वर आलेले महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी वेगवेगळ्या भागातील बाजार भागाचा स्वतंत्र दौरा करून नियम न पाळणाऱ्या दुकानदारांना ‘ऑन स्पॉट’ दंड ठोठावला. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.महापौरांच्या या जनजागृती दौऱ्यात गोपालनगर, प्रतापनगर परिसरात काही दुकाने सम-विषम नियमांचे उल्लंघन करताना आढळली. त्या दुकानदारांना ऑन स्पॉट दंड आकारण्याचे महापौरांनी निर्देश दिले. त्यांच्या निर्देशावरून मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडाची कारवाई केली. आयुक्त मुंढे यांनी बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. झाशी राणी चौक ते आनंद टॉकीज, बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधीसागर दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारामध्ये नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची त्यांनी शहानिशा केली. नियम मोडणाऱ्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानातील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली.काही मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर्स फूटपाथवर बसलेले आढळले. हॉकर्सला सध्या दुकान थाटण्याची परवानगी नसतानाही ते कसे काय दुकान थाटून बसले, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अशा हॉकर्सवरही यावेळी कारवाई करण्यात आली.वाहनचालकांवरही कारवाईमिशन बिगिन अगेनअंतर्गत दुचाकी आणि चारचाकीसाठीही नियम आहेत. दुचाकीवर एक आणि चारचाकीमध्ये चालकासहित तिघांना परवानगी आहे. या नियमांचे ज्या वाहनचालकांनी उल्लंघन केलेले आढळले, अशा वाहनचालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले. अशा वाहनचालकांवर तात्काळ कारवाई केली.महापौरांचा लक्ष्मीनगर भागाचा दौरामहापौर संदीप जोशी यांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत माटे चौकातून दौºयाला सुरुवात केली. गोपालनगर, प्रतापनगर, खामला, देवनगर आदी भागात फिरून कोविड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्याचे आवाहन केले. नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे आदी उपस्थित होते.