शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मेयोच्या अधिष्ठात्यांना लाच घेताना अटक

By admin | Updated: January 17, 2017 01:43 IST

औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ...

औषध पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच १५ हजार स्वीकारताना पकडले वैद्यकीय क्षेत्रात खळबळनागपूर : औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) लाचखोर महिला अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणेला साथीदारासह सोमवारी अटक करण्यात आली. विजय मिश्रा (४४) असे अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव असून तो एनआरएच वसतिगृहात खासगी मेस चालवतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.तक्रारकर्ता हा औषध विक्रेता आहे. नागपुरात त्याचे औषधीचे दुकान आहे. जुलै-२०१५ मध्ये मेयो रुग्णालयाच्या वतीने अधिष्ठात्यांनी औषध पुरवठा करण्याबाबत निविदा काढली होती. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने निविदा भरली. निविदेअंतर्गत तक्रारकर्त्याने डिसेंबर-२०१६ हिवाळी अधिवेशनात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधी पुरवठा केला. या औषधांची एकूण किंमत २ लाख ९४ हजार ६६० रुपये इतकी होती. हे बिल त्यांनी २८ डिसेंबर २०१६ रोजी मेयो रुग्णालयातील कार्यालयात मंजुरीसाठी सादर केले. परंतु ते बिल मंजूर झाले नाही. अखेर तक्रारकर्ते हे या बिलाच्या मंजुरीसंदर्भात अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणे यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्यास ही लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कार्यालयात गेल्या १० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर व गोंदिया येथे पडताळणी केली. अखेर सोमवारी सापळा रचण्यात आला. डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणेला विजय मिश्रा याच्यामार्फत लाचेचे १५ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. विजय मिश्रा हा बाबुळखेडा येथे राहतो. तो एनआरएच हॉस्टेल येथे खासगी मेस चालवतो.ही कारवाई एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस शिपाई रणजित बिसेन, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदन बिसेन, दवानंद मारबते, मोनाली चौधरी, गजानन गाडगे, पल्लवी बोबडे आदींनी केली. (प्रतिनिधी)‘सिस्टीम’चा फटका बसल्याची चर्चामेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणे यांच्यावरील कारवाई ही ‘सिस्टीम’चा फटका असल्याची चर्चा आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबईहून अनेक अधिकारी नागपुरात येतात. त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची जबाबदारी मेडिकल व मेयोला घ्यावी लागते. यावर्षी २५ अधिकारी आले होते. त्यांच्यासाठी सकाळच्या जेवणाची सोय मेयोने तर सायंकाळच्या जेवणाची सोय मेडिकलने केली होती. मेयोकडून सकाळच्या जेवणाचे २५ डबे मेयो वसतिगृहातील खासगी मेसमधून पाठविले जात होते. १५ दिवस एकवेळच्या जेवणाचा खर्च सुमारे ५० हजाराच्या घरात गेला होता. मेस संचालक पैशासाठी अधिष्ठात्यांना त्रास द्यायचा यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.