शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका टळणार! नेत्ररोग विभागाचे तीन शस्त्रक्रिया गृह होणार ‘मॉड्युलर’

By सुमेध वाघमार | Updated: July 19, 2024 19:20 IST

गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिसीनपासून ते गायनिक विभागापर्यंतचे सहा विभाग एकाच इमारतीत असणाऱ्या ५००बेडच्या ‘मेडिसीन युनिट’च्या कामाला सुरुवात झाली आहे.

नागपूर : इंदीरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विकासात आणखी एक भर पडणार आहे. शासनाने नेत्ररोग विभागाच्या तीन शस्त्रक्रिया गृह ‘माड्यूलर’ करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी १० कोटी २ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. ‘मॉड्यूलर’ शस्त्रक्रिया गृहामुळे शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका पूर्णत: टळणार आहे. 

    गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिसीनपासून ते गायनिक विभागापर्यंतचे सहा विभाग एकाच इमारतीत असणाऱ्या ५००बेडच्या ‘मेडिसीन युनिट’च्या कामाला सुरुवात झाली आहे. ‘ओपीडी’चे नतुनीकरण झाल्याने रुग्णांना याचा फायदा होत आहे. या शिवाय, सर्जिकल कॉम्प्लेक्सचे दोन मजल्यांचे बांधकाम, रुग्णालयातील सांडपाण्याची व व्यवसायीक ‘इन्फल्यूअंट’च्या निचऱ्यासाठी पाईप लाईनची प्रक्रियेचा (ईटीपी/एसटीपी) प्रकल्प, मुला-मुलींचे वसतीगृह, लाँड्री प्लांटचे नुतनीकरण, अग्निशमन यंत्रणा व क्रीडा मैदानाचा विकास लवकरच होऊ घातला आहे. आता तीन शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्यूलर’करण्याचा प्रस्तावाला गुरुवारी प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने पुढील दोन वर्षात मेयोचे बदलेले स्वरुप दिसणार आहे. 

-सर्जरी, आॅर्थाेपेडिक, ईएनटीचे मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृह मेयोमधील सर्जरी, आॅर्थाेपेडिक विभागाचे शस्त्रक्रिया गृह यापूर्वीच ‘मॉड्यूलर’ झाले आहे. ईएनटी विभागाचा शस्त्रक्रिया गृहाचे काम सुरू आहे. गुरुवारी नेत्ररोग विभागाच्या तीन शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्यूलर’ करण्याला मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक शस्त्रक्रिया गृहाचा बांधकामासाठी २ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, रिकव्हरी रुम, पॅसेज ंआणि आवश्यक यंत्र सामूग्रीसाठी १ कोटी ३२ लाख ८० हजार ९३० रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

-मेयोच्या विकासात भरमेयोतील तीन शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्यूलर’ करण्यास परवानगी मिळाल्याने रुग्णालयाच्या विकासात भर पडणार आहे. तीन शस्त्रक्रिया गृहाचे काम सुरू होणार असलेतरी शस्त्रक्रिया बंद राहणार नाहीत. दुसऱ्या विभागाचा शस्त्रक्रिया गृहात या शस्त्रक्रिया केल्या जातील. ‘मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृहामुळे संसर्गाचा धोका आणखी कमी होईल. रुग्णांसोबतच डॉक्टरांना याचा मोठा लाभ होईल.-डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल