शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या बाळाची बालसुधारगृहात रवानगी
2
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
3
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
4
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
5
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
6
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
7
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
8
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
9
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

मेयो : गुंगीचे औषधी देऊन लुटणाऱ्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 9:24 PM

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटमार करणाऱ्या एका इसमाला मेयोच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंगीचे औषधे मिळाली. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सतर्कता पाळण्याचे आवाहन ‘एमएसएफ’चे वरिष्ठ सुपरवायजर अधिकारी रमेश सिंग यांनी केले.

ठळक मुद्देएमएसएफ जवानांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटमार करणाऱ्या एका इसमाला मेयोच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंगीचे औषधे मिळाली. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सतर्कता पाळण्याचे आवाहन ‘एमएसएफ’चे वरिष्ठ सुपरवायजर अधिकारी रमेश सिंग यांनी केले.प्राप्त माहितीनुसार, कार्तिक कुवरलाल कटरे (१९) रा. गोंदिया गोरेगाव हा हिंगणा येथील बहिणीला भेटून १९ एप्रिल रोजी नागपूरला आला होता. मध्यवर्ती रेल्वे स्थानकाकडे पायी जात असताना लोहापूल येथे बाईकवर स्वार असलेल्या दोन इसमाने त्याला थांबविले. यातील एक इसम ज्ञानेश्वर पेशने (५५) याने कार्तिकला कुठे जात आहे, अशी विचारपूस करीत आम्हीही गोंदियाचे रहिवासी आहोत,अशी भूलथाप दिली. सोबत चालण्याचा आग्रहही केला. कार्तिकने त्याच्यावर विश्वास ठेवून बाईकवर स्वार झाला. मेयोच्या मुख्य द्वाराजवळ आल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वरने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून उतरला. परत येताना त्याने तीन शीतपेयाच्या बॉटल्स आणल्या. त्याच्यासमोर तेदोघे शीतपेय प्याले. कार्तिकही शीतपेय प्याला. नंतर तिघेही बाईकने समोर निघाले. पारडी (तिरोडी) येथे येतपर्यंत कार्तिक बेशुद्ध झाला. त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून त्याला शेतात टाकून दोघेही पसार झाले. सायंकाळी कार्तिक शुद्धीवर येताच झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला. गावकऱ्यांच्या मदतीने बहिणीला फोन लावला. बहिणीने मावसभावाला याची माहिती दिली. मावसभावाने तातडीने कार्तिकला गाठले. कार्तिकची प्रकृती खालावली असल्याने त्याला मेयोमध्ये भरती केले. २० एप्रिल रोजी सकाळी त्याला रुग्णालयातून सुटी मिळाली. रुग्णालयाच्या ओपीडी बाहेर नातेवाईकांसोबत कार्तिक बोलत असताना अचानक त्याला समोर आरोपी ज्ञानेश्वर आढळून आला. कार्तिकने आरडाओरड करताच आरोपी पळायला लागला. एमएसएफच्या जवानांच्या ही बाब लक्षात येताच मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले. झालेला प्रकार जाणून घेतल्यावर आरोपीची तपासणी केली. त्याच्या खिशात गुंगीच्या औषधासोबतच इतरही औषधे आढळून आली. जवानांनी आरोपीला तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले.गुंगीचे औषध देऊन लुटमार करणारा मेयोच्या परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा एमएसएफचे जवान सतर्क राहत असल्याचे समोर आले. वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी जवानांचे कौतुक केले. ही कारवाई एमएसएफचे एसएसओ रमेश सिंग यांच्या मार्गदर्शनात आकाश मोहोड, दिलीप लांबट, ओम चौधरी, मुकेश तारु यांनी केली.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)RobberyदरोडाArrestअटक