शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मविआ म्हणजे महाअनाडी आघाडी, देशहित त्यांच्या अजेंड्यावरच नाही; योगी आदित्यनाथ यांची टीका

By योगेश पांडे | Updated: November 12, 2024 19:25 IST

मोहन मते व प्रवीण दटके यांच्या प्रचारासाठी सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडीतील नेते हे केवळ स्वार्थासाठीच राजकारण करतात. त्यांच्या अजेंड्यावर देश व समाजहित कधीही नव्हते आणि राहणारदेखील नाही. त्यांच्यासाठी केवळ व्होटबॅंकच महत्त्वाची आहे. प्रत्यक्षात महाविकासआघाडी ही खऱ्या अर्थाने महाअनाडी आघाडी आहे, या शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरातील रेशीमबाग परिसरात आयोजित प्रचारसभेदरम्यान ते मंगळवारी सायंकाळी बोलत होते.

नागपूर मध्यचे भाजपचे उमेदवार प्रवीण दटके व नागपूर दक्षिणचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने देशाच्या सीमा सुरक्षित करत येथील परंपरा व इतिहासाची प्रतिके जपली आहेत. कॉंग्रेसलादेखील देशाच्या सीमा सुरक्षित करता आल्या असत्या. मात्र व्होट बॅंकेच्या राजकारणापुढे त्यांनी देशाला कधीच महत्त्व दिले नाही. त्यांच्याजवळ देशाच्या विकासाचे कुठलेही व्हिजन नाही. सातत्याने समाजाची दिशाभूल करून महाविकासआघाडीकडून देशात जातीपातींमध्ये वाटण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला तर त्यांना लव्ह जिहाद व लॅंड जिहादची भूमी करायचे आहे, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी लावला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.विकास कुंभारे, आ.कृपाल तुमाने, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महिला सुरक्षेप्रति कॉंग्रेस उदासीनदेशात व राज्यात कॉंग्रेसला अनेक वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली. मात्र देशाच्या सीमा, सुरक्षा, प्रतिके यांचे रक्षण करण्यासाठी कधीच त्यांनी पुढाकार घेतला नाही. इतकेच काय तर महिलांच्या सुरक्षेप्रतिदेखील ते कायम उदासीन राहिले. पाकिस्तानला एकाही दहशतवादी हल्ल्यानंतर थेट सवाल करण्याची हिंमत त्यांच्यात का नव्हती असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.

खरगे खरे बोलायला घाबरतात का ?माझ्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने टीका करत आहेत. मात्र निजामाच्या रझाकारांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे गाव जाळले होते. त्यात त्यांची आई, मावशी आणि बहीण मरण पावले. पण, खरगे खरे बोलायला घाबरतात, कारण निजामावर आरोप केले तर मुस्लिम मते मिळणार नाहीत हेच त्यांच्या डोक्यात आहे. मतांसाठी खरगे कुटुंबाचा त्याग विसरले, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी लावला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४