माेबाइल टाॅवरच्या साहित्याची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST2021-08-12T04:12:24+5:302021-08-12T04:12:24+5:30

देवलसापार : चाेरट्याने माेबाइल टाॅवरची काही उपकरणे चाेरून नेली. या साहित्याची किंमत ३० हजार रुपये असून, ही घटना देवलापार ...

Material theft of mobile tower materials | माेबाइल टाॅवरच्या साहित्याची चाेरी

माेबाइल टाॅवरच्या साहित्याची चाेरी

देवलसापार : चाेरट्याने माेबाइल टाॅवरची काही उपकरणे चाेरून नेली. या साहित्याची किंमत ३० हजार रुपये असून, ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार येथे नुकतीच घडली.

हिवराबाजार (ता. रामटेक) येथे एटीसी टेलिकाॅम सेंटर आहे. तिथे कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने बीटीएस बाॅक्समधील प्रत्येकी आठ हजार रुपये किमतीचे तीन रूस कार्ड व सहा हजार रुपयांचे तीन जम्पर वायर, असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. चाेरी झाल्याचे लक्षात येताच मंगेश माराेतराव नागाेसे (३०, रा. शीतलवाडी, ता. रामटेक) यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार माेरेश्वर नागाेसे करीत आहेत.

Web Title: Material theft of mobile tower materials