माचिसने पेटविला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST2020-12-14T04:25:01+5:302020-12-14T04:25:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सिगारेट पेटविण्यासाठी समोरच्या तरुणाला माचिस मागितल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान एकावर ब्लेडने ...

The match ignited the argument | माचिसने पेटविला वाद

माचिसने पेटविला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सिगारेट पेटविण्यासाठी समोरच्या तरुणाला माचिस मागितल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान एकावर ब्लेडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात झाले. सदरमधील पोलीस चौकीसमोर शनिवारी रात्री ही घटना घडली.

अमिर बशिर शेख (वय ३१, रा. मिनीमाता नगर) असे जखमीचे नाव आहे. तो शनिवारी रात्री ११ च्या सुमारास सदरमधील छावणी पोलीस चौकीसमोर असलेल्या मिश्राच्या पानटपरीवर सिगारेट प्यायला आला. पान टपरी बंद दिसल्याने तेथे उभा असलेल्या शुभम मांढरे नामक आरोपीला अमिरने सिगारेट पेटविण्यासाठी माचिस मागितली. त्याने माचिस नाही म्हटल्याने या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. नंतर आरोपी मांढरेने त्याच्या हाताच्या बोटातील नखात लपवून असलेल्या ब्लेडने अमिरच्या तोंडावर घाव मारून त्याला जबर जखमी केले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी या दोघांना दूर केले. अमिरने दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी मांढरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.

---

Web Title: The match ignited the argument