शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

निवारा केंद्रातील आश्रितांना मास्क बनविण्याचे प्रशिक्षण : मनपाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 01:00 IST

रवीनगर येथील अग्रसेन भवन बेघर निवारा केंद्रामधील आश्रितांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच मानसिक समुपदेशनही करीत आहे.

ठळक मुद्देमानसिक समुपदेशनासह व्यायाम आणि मनोरंजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामासाठी नागपुरात आलेल्या व लॉकडाउनमुळे शहरातच अडकलेल्या नागरिकांसाठी मनपाचे बेघर निवारा केंद्र आश्रयाचे स्थान ठरत आहेत. येथे आश्रयाला असलेल्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. सोबतच येथील महिला व पुरूषांना कौशल्य प्रशिक्षणाचेही धडे दिले जात आहेत. रवीनगर येथील अग्रसेन भवन बेघर निवारा केंद्रामधील आश्रितांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच मानसिक समुपदेशनही करीत आहे. व्यायामासह मनोरंजनासाठी विविध खेळांचेही आयोजन केले जात आहे अग्रसेन भवन निवारा केंद्रामध्ये १४९ महिला व पुरूष रहिवासी आहेत. सुरूवातील एकूण १५१ निवासीत होते. मात्र दोन जण निवारा केंद्रातून गेल्यानंतर आता १४९ महिला, पुरूष आणि लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांच्या सकस आहारासह त्यांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी मनपा घेत आहे. सवर्वांंचे नियमीत मानसिक समुपदेशन केले जाते. त्यांच्या आरोग्याच्यासाठी सकाळी योगाचे धडे , कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, लगोरी यासारख्या खेळांचेही आयोजन दररोज केले जाते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासंकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.चार महिला व दोन पुरूष अशा गटात सर्व रहिवाश्यांची विभागणी करून त्यांना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत बॅचनिहाय प्रशिक्षण दिले जात आहे. मनपाच्या स्वाती गभने सर्व रहिवाश्यांना मास्कचे प्रशिक्षण देत आहेत. यासह त्यांना सौर उर्जेबाबत माहिती दिली जात असून सुतार काम, पक्ष्यांची घरटी तयार करणे, शोभेच्या वस्तू निर्मितीचेही प्रशिक्षण दिले जात आहे. लहान मुलांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना खेळणी आणि चित्रकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे.नियमित आरोग्य तपासणीशारिरीक स्वच्छतेची विशेष काळजी घेत पुरूष रहिवाश्यांचे दाढी, केश कर्तन केले जाते. तर लहान मुलांचेही नियमीत केश कर्तन करून देण्यात येते. वैद्यकीय सुविधेच्या दृष्टीने निवारा केंद्रामध्ये प्रथमोपचार बॉक्सची व्यवस्था आहे. याशिवाय सर्व रहिवाश्यांची दररोज तपासणी करून आवश्यक तो औषधोपचार केला जातो.....आवश्यक साहित्याचा पुरवठाआवश्यक साहित्यांचा दर आठवड्याला महिलांना आवश्यक साहित्याच्या किटचे वितरण केले जाते. या किटमध्ये साबण, टूथपेस्ट, मेकअपचे साहित्य, सॅनिटायजर, टिकली, सॅनिटरी पॅड, व्हिटॅमिन सी च्या गोळ्या, कंगवा, कपडे धुण्याचे पावडर आदी आवश्यक साहित्याचा समावेश असतो. आरोग्याच्या सुरक्षेकरिता सर्व उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपातर्फे देवेंद्र क्षीरसागर अग्रसेन भवन निवारा केंद्राच्या देखरेखीचे काम पाहतात.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका