१०७ नागरिकांना दंड करुन दिले मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST2021-01-08T04:25:11+5:302021-01-08T04:25:11+5:30
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १०७ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ५३ ...

१०७ नागरिकांना दंड करुन दिले मास्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १०७ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २६७६५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४१ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १७, धरमपेठ १०, हनुमाननगर १०, धंतोली ९, नेहरुनगर १२, गांधीबाग ४, सतरंजीपुरा ११, लकडगंज १०, आशीनगर १०, मंगळवारी १२ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत २१२९५ नागरिकांकडून १ कोटी ६ लाख ४७ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.