नागपुरात छळामुळे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:20 IST2018-04-11T00:20:07+5:302018-04-11T00:20:17+5:30
माहेरून पैसे आणावे म्हणून एका विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नागपुरात छळामुळे विवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माहेरून पैसे आणावे म्हणून एका विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीरेंद्र किसन सोळंकी (वय २८), किसन भगवानदास सोळंकी (वय ५५), शांती किसन सोळंकी (वय ५०) आणि गुडिया किसन सोळंकी (वय २३) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व डोबीनगर, मानेवाडा येथे राहतात.
वीरेंद्र सोळंकीचा विवाह पूजासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. एप्रिल २०१४ पासून तो मार्च २०१८ पर्यंत आरोपींनी पूजाच्या मागे माहेरून पैसे आणावे म्हणून अनेकदा तगादा लावला होता. वेळोवेळी ते पूजाला पैसे आणायला लावत होते. नकार दिल्यास शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पूजा सोळंकीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला उपरोक्त आरोपीच जबाबदार असल्याची तक्रार शत्रुघ्न मोहनलाल परमार (वय ४५, रा. सोनेझरी नगर, उमरेड) यांनी अजनी ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.