शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या तरुणीचे 'शादी डॉट कॉम' मुळे जीवन उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:25 IST

दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे.

ठळक मुद्देलग्न करून काही तासातच ठकबाज नवरदेवाचे पलायनदिल्लीचा ठगबाज : रोख आणि दागिनेही लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे.पीडित तरुणीने लग्न जुळण्यासाठी शादी डॉट कॉमवर आपली माहिती अपलोड केली होती. काही दिवसांपूर्वी आरोपी शर्मा याने त्यांच्याशी आॅनलाईन संपर्क केला. आपण लग्नास इच्छुक असल्याचे त्याने सांगितले. आपले वडील सनदी अधिकारी (आयएस) असल्याचे सांगितले. घरची आर्थिक स्थिती संपन्न असली तरी आपली स्वत:च्या बळावर काही तरी करून दाखवण्याची इच्छा असल्याचीही थाप मारली. ही तरुणी त्याच्या थापेबाजीला बळी पडली. ती दिल्लीला नोकरीच्या निमित्ताने गेली असता त्यालाही भेटली. त्यावेळी त्याचे वर्तन पाहून तिने लग्नास होकार दिला. त्यानंतर आरोपी शर्मासोबत तिचा वारंवार फोनवरून संपर्क होऊ लागला. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शर्मा नागपुरात आला. त्याने या तरुणीला घरगुती पद्धतीने लग्न करू आणि नंतर मुंबईत जंगी पार्टी (रिसेप्शन) देऊ असे म्हटले होते. त्यानुसार तरुणीने संमती दिली. ठरल्याप्रमाणे त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या काही तासानंतर बुधवारी ११ जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास ही तरुणी आई आणि बहिणीसोबत महत्त्वाच्या कामानिमित्ताने बाहेर गेली. सायंकाळी ५ नंतर परत आली. घरी येताच तिला धक्का बसला. शर्माने घरातील मंगळसूत्र, कानातील दागिने आणि रोख १९ हजार रुपये घेऊन पळ काढला होता. रोख आणि दागिने शोधण्यासाठी आरोपीने घरातील साहित्यही अस्तव्यस्त केले.पीडित तरुणीने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात तिने गुरुवारी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार रवींद्र सावळे यांनी कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. ठगबाज शर्माचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्न