शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थीतूनच सुटतील वैवाहिक वाद

By admin | Updated: July 5, 2015 02:58 IST

वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी ...

कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बोहरी यांचे प्रतिपादननागपूर : वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी आपले वाद सोडवण्यासाठी याच माध्यमाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी येथे केले. कौटुंबिक न्यायालय परिसरात मध्यस्थी केंद्र आणि जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोहरी हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मध्यस्थी प्रक्रियेची सर्वात अधिक गरज कौटुंबिक न्यायालयाला आहे. वैवाहिक वाद निर्माण झाला की, न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात भादंविच्या ४९८ अ, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण, कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट, खावटी, मुलांचा ताबा, अशी प्रकरणे एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे पती-पत्नीशिवाय संपूर्ण कुटुंबच प्रभावित होते. यावर मध्यस्थी हाच एकमेव तोडगा आहे. कौटुंबिक विवाद हे परस्पर नात्यांवर अवलंबून असतात. अतिशय संवेदनशीलपणे ते हाताळावे लागतात. त्यामुळे सर्वांनीच समन्वय साधण्याचे काम करावे, जेणेकरून पक्षकारांना योग्य लाभ मिळेल. कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी केंद्र भरीव कार्य करीत असून, उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचेही ते म्हणाले. मनाप्रमाणे न्याय मिळवता येतोया कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा न्यायालयाच्या सहायक सत्र न्यायाधीश श्रीमती ए. सी. राऊत या मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि मध्यस्थ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, न्यायालयात प्रकरण दाखल होताच पक्षकारांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढण्यापूर्वीच प्रकरणे मध्यस्थी केंद्राकडे पाठविले तर तडजोड होण्याची शक्यता अधिक असते. न्यायालयात खटला चालून निकाल आपल्याच बाजूने लागेल, याबाबत अनिश्चितता असते. मध्यस्थी प्रक्रियेत मात्र स्वत:च्या मनाप्रमाणे जलदगतीने न्याय मिळवता येतो. कितीही वेळा प्रकरण मध्यस्थी प्रक्रियेसाठी पाठविता येते. अन् मध्यस्थीची निर्माण झाली गरजमध्यस्थी केंद्राचा मूळ गाभा, त्याची गरज आणि फायदे यावर बोलताना मध्यस्थ अ‍ॅड. ज्योती धर्माधिकारी म्हणाल्या की, कायद्याचा गैरवापर होऊन कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ लागली होती. त्यावेळी मध्यस्थीची खरी गरज निर्माण झाली. या कार्यक्रमात व्यासपीठावर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आणि मध्यस्थी केंद्राचे समन्वयक सुभाष काफरे, प्रशिक्षित मध्यस्थ अ‍ॅड. राजेंद्र राठी, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. एस. ए. दावडा तर आभारप्रदर्शन वकील संघाचे सहसचिव अ‍ॅड. श्रीकांत गौरकर यांनी केले. पक्षकार पायल जांगडे आणि प्रशिक्षित मध्यस्थ अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभावी लघुनाटिका पत्नीच्या आईमुळे पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला टोकाचा वाद मध्यस्थी प्रक्रियेद्वारे कसा संपुष्टात येऊ शकतो, यावर अत्यंत प्रभावीपणे एक लघुनाटिका सादर करून उपस्थितांना स्तब्ध करण्यात आले. या नाटिकेत खुद्द न्यायाधीश सुभाष काफरे यांनी न्यायाधीशाची भूमिका वठविली. मध्यस्थाची भूमिका शर्मिला चरलवार, पतीची भूमिका अ‍ॅड. नितीन रूडे, पत्नीची भूमिका अ‍ॅड. दर्शना गांधी, आईची भूमिका विवाह समुपदेशक श्रीमती एस. पी. लानकर यांनी अत्यंत प्रभावीपणे वठविली. अ‍ॅड. भारत टेकाम, अ‍ॅड. अमृता घोंगे यांनी वकिलांची भूमिका वठविली. या नाटिकेचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राजेंद्र राठी यांनी केले.(प्रतिनिधी)