रामटेक शहरातील बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:36+5:302021-06-02T04:08:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरासह ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात हाेताच राज्य शासनाने लाॅकडाऊन काही अंशी ...

रामटेक शहरातील बाजारपेठ फुलली
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरासह ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात हाेताच राज्य शासनाने लाॅकडाऊन काही अंशी शिथिल केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंसाेबतच इतर दुकानेही उघडायला सुरुवात झाली. परिणामी, पहिल्याच दिवशी (मंगळवार, दि. १) रामटेक शहरातील मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी फुलली हाेती. शिवाय, राेडवर नागरिकांची वर्दळदेखील वाढली हाेती.
राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केल्यानंतर दाेन महिन्यांपासून केवळ औषध व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले हाेते. ही दुकाने सुरू व बंद करण्याच्या वेळा ठरवून देण्यात आल्या हाेत्या. शिवाय, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगाही प्रशासनाने उगारला हाेता. काेराेना संक्रमण कमी हाेत असल्याचे स्पष्ट हाेताच शासनाने लाॅकडाऊन काहीसे शिथिल करण्याचा निर्णय घेत त्यावर मंगळवारपासून अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.
माेसमी वाऱ्याच्या पावसाचे आगमन व्हायचे असले तरी अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. शिवाय, राेहिणी नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारीदेखील सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने व कृषी सेवा केंद्र उघडण्यात आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी घर दुरुस्तीचे साहित्य, बियाणे, खते व इतर आवश्यक बाबी खरेदीला सुरुवात केल्याने बाजारपेठेत पहिल्याच दिवशी नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ दिसून आली.
...
काळजी घेणे आवश्यक
सध्या दुकाने राेज सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे दुकानांसमाेर व राेडवर नागरिक गर्दी करण्याची शक्यता बळावली आहे. ही गर्दी काेराेनाच्या पथ्यावर पडू नये, यासाठी नागरिक मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतात की नाही, गर्दी नियंत्रित असते की नाही, दुकानदारांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्यांनी काेराेना टेस्ट केल्या की नाही, या मूलभूत बाबींवर नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरीकडे, काेराेना संक्रमण पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकांचे स्वत:साेबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे.