शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात आंधळी झाली ‘मारिया’; लग्नासाठी केली हिऱ्याच्या अंगठीची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:11 IST

पाळणाघरातून पोलिस स्टेशनपर्यंतचा प्रवास : सीसीटीव्हीने दिला पुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान बाळाच्या संगोपनाचे काम करीत असताना घरातून सोने व हिऱ्याच्या नऊ लाखांच्या अंगठी गायब करणाऱ्या तरुणीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तिला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. तिने स्वतःच्या प्रियकरासोबत लग्नासाठी अंगठी चोरल्याची कबुली दिली आहे.

मारिया सूर्यराव शुक्ला (वय २५, विनायक नगर, खैरी) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती नूपुर अग्रवाल (३२, कडबी चौक) यांच्या १५ महिन्यांच्या बाळाच्या संगोपनाचे काम करत होती. नूपुर यांनी त्यांची सोन्याची तसेच हिऱ्याची अंगठी बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. ती अंगठी चोरीस गेल्यावर त्यांना मारियावर शंका आली. १८ मे रोजी रात्री साडेआठ वाजता मारियाने दोन्ही अंगठ्या ड्रॉवरमधून काढल्याची बाब सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाली. मारियाविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीदरम्यान मारियाला प्रियकरासोबत लग्न करायचे होते व तिने ५० हजार रुपये उधार मागितल्याचा प्रकार समोर आला. तिने नूपुरची अंगठी आवडल्याचे बोलून दाखविले होते.

प्रियकराजवळ सापडली अंगठीतिच्या फोनच्या लोकेशनवरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने चोरी केल्याची कबुली दिली. तिने हिऱ्याची अंगठी तिचा प्रियकर पवन बडगुजर याच्याजवळ ठेवल्याचे सांगितले. पोलिसांना ट्रान्सिट रिमांडवर तिला नागपुरात आणले, तर तिच्या प्रियकरालादेखील नाशिकमधून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर, अनंता गारमोरे, मारोती जंगीलवाड, नितीन राणे, प्रमोद सालोटकर, मनीष मेश्राम, विकास पाठक, पवन कामारकर, दीपाली जवादे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर