कळमेश्वरमध्ये पायी मार्च तर सावनेरमध्ये निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:55+5:302020-12-09T04:07:55+5:30
शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर नरखेड : नवीन कृषी कायद्याचा निषेध करित नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी भारत बंदला प्रतिसाद दिला. शेतकरी ...

कळमेश्वरमध्ये पायी मार्च तर सावनेरमध्ये निदर्शने
शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर
नरखेड : नवीन कृषी कायद्याचा निषेध करित नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी भारत बंदला प्रतिसाद दिला. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित पॅथर,व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत तहसील कार्यालयावर धडकले. याप्रसंगी तहसीलदार डी.के.जाधव यांना निवेदन देण्यात आले. पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर,उपसभापती वैभव दळवी, माजी सभापती राजेंद्र हरणे, सतीश शिंदे, न.प. उपाध्यक्ष अजय बालपांडे, हिंमत नखाते, संजय चरडे, अनिल कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.
रामटेकमध्ये समिश्र प्रतिसाद
रामटेक: शेतकरी संघटनाच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या बंदला रामटेकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या काळात मात्र रामटेकची बाजारपेठ,बँका,एस.टी.बसेस,कृषी उत्पन्न बाजार समिती, सरकारी कार्यालय व इतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. व्यापारी मंडळाने वेळेवर बंद मध्ये सहभागी होण्याचा नकार दिला. भारतीय कम्युनिस्ट पार्टी ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकात केंद्र सरकार विरुद्ध निर्दशन केली. शेवटी रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राजू हटवार,ॲड.आनंद गजभिये ,ॲड.प्रफुल्ल अंबादे, दुधराम सव्वालाखे,पी.टी.रघुवंशी,भागवत सहारे, नकुल बरबटे,व किसान सभेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.